राजकीय पक्षांच्या वाढत्या दबावानंतर युनूस यांच्याकडून निवडणुकीची घोषणा

बांगलादेशमध्ये पुढील वर्षी होणार निवडणूक

राजकीय पक्षांच्या वाढत्या दबावानंतर युनूस यांच्याकडून निवडणुकीची घोषणा

बांगलादेशचे अंतरिम सरकार प्रमुख मोहम्मद युनूस यांनी अखेर आगामी सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली आहे. युनूस यांनी गुरुवारी सांगितले की पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये निवडणुका होतील. निवडणुका घेण्यासाठी राजकीय पक्षांकडून दीर्घकाळ दबाव आल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. युनूस यांच्या निवडणूक घोषणेनंतर शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगविरुद्ध हिंसाचार वाढला आहे. गुरुवारी ढाका येथील अवामी लीगच्या केंद्रीय कार्यालयाला आग लावण्यात आली.

युनूस यांनी सांगितले की राष्ट्रीय सहमती आयोगाने जुलैच्या राष्ट्रीय सनदेची अंमलबजावणी करण्याचे संभाव्य मार्ग सांगणाऱ्या अंतरिम सरकारला दोन शिफारसी सादर केल्या. प्रस्तावानुसार, सरकार सनदेच्या घटनात्मक सुधारणा तरतुदी लागू करण्यासाठी एक विशेष आदेश जारी करेल आणि त्यानंतर जनमत चाचणी घेतली जाईल. युनूस यांनी घोषणा केली की राष्ट्रीय संसदीय निवडणुका आणि जनमत चाचणी एकाच दिवशी होईल.

अहवालानुसार, जर जनमत चाचणीने प्रस्तावित सुधारणांना मान्यता दिली, तर पुढील संसद घटनात्मक सुधारणा परिषद म्हणून काम करेल आणि २७० दिवसांच्या आत संविधानात सुधारणा करेल. जर संसदेला दिलेल्या मुदतीत असे करण्यात अपयश आले, तर प्रस्तावित सुधारणा संविधानातच समाविष्ट केल्या जातील. दुसऱ्या शिफारशीत असे म्हटले आहे की सुधारणा २७० दिवसांच्या आत पूर्ण कराव्यात.

हेही वाचा..

अल- फलाह विद्यापीठ ईडीच्या रडारवर; आर्थिक व्यवहारांची होणार चौकशी

माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मुलाची किती मालमत्ता ईडीने केली जप्त?

छत्तीसगडमध्ये चकमकीत सहा माओवादी ठार

फिलिपिन्समध्ये क्षयरोगाविरोधात मोहीम

दरम्यान, गुरुवारी दुपारी ढाका अवामी लीगच्या मध्यवर्ती कार्यालयाला आग लागल्याचे समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, १० ते १५ जणांच्या गटाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावर लाकूड, कागद, इतर साहित्य गोळा केले आणि त्यांना आग लावली. ५ ऑगस्ट रोजी अवामी लीग सरकार पडल्यानंतर इमारतीलाही आग लावण्यात आली होती.

Exit mobile version