पीसीबीच्या हस्तक्षेपाला कंटाळून गॅरी कर्स्टनचा राजीनामा

पीसीबीच्या हस्तक्षेपाला कंटाळून गॅरी कर्स्टनचा राजीनामा

पाकिस्तान क्रिकेट संघातील सततचे बदल आणि अस्थिरता पुन्हा एकदा समोर आली आहे. माजी मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी आपल्या राजीनाम्यामागचे कारण स्पष्ट करताना पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी)वर थेट आरोप केले आहेत.

दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू आणि भारताला २०११ चा वनडे विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे कर्स्टन यांची टी-२० विश्वचषक २०२४पूर्वी पाकिस्तानच्या व्हाईट-बॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांनी केवळ सहा महिन्यांतच पदाचा राजीनामा दिला.

कर्स्टन यांनी सांगितले की, पीसीबीकडून होणारी सततची हस्तक्षेपाची पातळी खूपच जास्त होती. त्यामुळे संघात स्थिर वातावरण निर्माण करणे अत्यंत कठीण झाले. “संघाच्या कामकाजात बाह्य दबाव इतका वाढला होता की खेळाडूंशी योग्य समन्वय साधणे अवघड झाले,” असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा:

इराणच्या नतांज अणु केंद्रावर हल्ला!

गौरक्षक ‘फरसा वाले बाबां’च्या मृत्यूनंतर दिल्ली-आग्रा महामार्ग जाम

इराणकडून होर्मुज सामुद्रधुनी बंद; २० देशांची नाराजी

मिराज-2000 लढाऊ विमाने २०३८-३९ पर्यंत देणार सेवा

तसेच, संघाचे अपेक्षित निकाल न लागल्यास प्रशिक्षकच सहज लक्ष्य बनतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. अशा परिस्थितीत सर्व जबाबदारी कोचवर टाकली जाते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

याशिवाय, कर्स्टन यांनी पीसीबीवर करारातील अनियमितता, थकबाकी रक्कम आणि वारंवार करारभंग यांसारखे गंभीर आरोपही केले. या सर्व कारणांमुळेच त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, कर्स्टन यांची श्रीलंका क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर सनथ जयसूर्या यांनी पद सोडल्याने कर्स्टन यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. ते १५ एप्रिलपासून पदभार स्वीकारणार असून त्यांचा कार्यकाळ २०२८ पर्यंत असेल.

Exit mobile version