ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकमेव कसोटीसाठी भारतीय महिला संघ जाहीर

ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकमेव कसोटीसाठी भारतीय महिला संघ जाहीर

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला असून हा कसोटी सामना ६ ते ९ मार्च २०२६ दरम्यान पर्थ येथे खेळवण्यात येणार आहे.

दुखापतीमुळे काही काळ बाहेर असलेली प्रतीका रावल, ज्या भारताच्या विश्वचषक विजयी मोहिमेचा भाग होत्या, त्यांचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, विकेटकीपर जी. कमलिनी ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाहेर झाली असून निवड समितीने त्यांच्या जागी उमा छेत्रीचा भारताच्या टी-२० आणि एकदिवसीय संघात समावेश केला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये आतापर्यंत ११ कसोटी सामने झाले आहेत. त्यापैकी भारताने 1 सामना जिंकला असून ऑस्ट्रेलियाने ४ सामने जिंकले आहेत. उर्वरित ७ सामने अनिर्णित राहिले आहेत. दोन्ही संघांमधील शेवटचा कसोटी सामना २१ ते २४ डिसेंबर २०२३ दरम्यान खेळला गेला होता, ज्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय महिला संघ ३ टी-२०, ३ एकदिवसीय आणि १ कसोटी सामना खेळणार आहे. प्रथम टी-२० मालिका, त्यानंतर एकदिवसीय मालिका आणि अखेरीस कसोटी सामना खेळवण्यात येईल.


भारत महिला कसोटी संघ :

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, अमनजोत कौर, ऋचा घोष (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), प्रतीका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, रेणुका सिंह ठाकूर, स्नेह राणा, क्रांती गौड, वैष्णवी शर्मा, सायली सतघारे.


एसीसी राइजिंग स्टार महिला आशिया कपसाठी इंडिया ‘ए’ संघ :

हुमैरा काझी, वृंदा दिनेश, अनुष्का शर्मा, दिया यादव, तेजल हसाबनीस, नंदनी कश्यप (विकेटकीपर), ममता एम (विकेटकीपर), राधा यादव (कर्णधार), सोनिया मेंढिया, मिन्नू मणी, तनुजा कंवर, प्रेमा रावत, सायमा ठाकूर, जिन्तमणी कलिता, नंदनी शर्मा.

दिया यादव आणि ममता एम यांना अद्याप फिटनेस चाचणी उत्तीर्ण करायची आहे.

Exit mobile version