टेस्टमध्ये ३०० विकेट्स घेणारा आठवा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला पॅट कमिन्स

टेस्टमध्ये ३०० विकेट्स घेणारा आठवा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला पॅट कमिन्स

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने विश्व टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात ६ बळी घेतले आणि टेस्ट क्रिकेटमधील आपले ३०० विकेट्स पूर्ण केले.

पॅट कमिन्स हा टेस्ट क्रिकेटमध्ये ३०० विकेट्स घेणारा आठवा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला आहे. कगिसो रबाडाला बाद करत त्याने ही ऐतिहासिक कामगिरी पूर्ण केली. कमिन्सने १८.१ षटकांत केवळ २८ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. त्याच्या भेदक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला १३८ धावांवर रोखले आणि पहिल्या डावातील २१२ धावांच्या जोरावर ७४ धावांची आघाडी मिळवली.

हा सामना पॅट कमिन्सच्या कारकिर्दीतील ६८वा टेस्ट सामना आहे. आतापर्यंत १२६ डावांत त्याने ३०० विकेट्स घेतल्या असून, यामध्ये १४ वेळा ५ किंवा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याचे सर्वोत्तम कामगिरी – २३ धावांत ६ विकेट्स आहे.

ऑस्ट्रेलियाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्याचे स्थान आता असे आहे:

३२ वर्षीय कमिन्स अजून किमान तीन-चार वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतो, त्यामुळे त्याच्याकडे ५०० विकेट्स घेण्याची संधी देखील आहे.

गोलंदाजीसह कमिन्स हा उपयुक्त फलंदाजही आहे. त्याने ६८ टेस्टमध्ये ९९ डावांत ३ अर्धशतकांसह १४६१ धावा केल्या आहेत.

कर्णधार म्हणूनही त्याचा प्रभाव जबरदस्त राहिला आहे — त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने वनडे वर्ल्ड कप २०२३ आणि विश्व टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ जिंकले. आता WTC फायनल २०२५ जिंकण्याचीही त्याला संधी आहे.

Exit mobile version