महिला प्रीमियर लीग २०२६ ची सुरुवात आजपासून होत आहे. पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होईल. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करते, तर भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आरसीबीचे नेतृत्व करते. हा सामना नवी मुंबईतील डॉ. डी वाय पाटील मैदानावर खेळला जाईल. टॉस संध्याकाळी ७:०० वाजता होईल आणि सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल.
मुंबई इंडियन्स हा महिला प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी संघ आहे. या फ्रँचायझीने तीनपैकी दोन जेतेपदे जिंकली आहेत, तर आरसीबीने एकदा जेतेपदाला गवसणी घातली आहे. म्हणूनच दोन्ही संघांमध्ये अटीतटीचा सामना अपेक्षित आहे. दोन्ही संघांनी महिला प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. मुंबई इंडियन्सने त्यापैकी चार सामने जिंकले आहेत, तर आरसीबीने तीन जिंकले आहेत.
ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी ही महिला क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानली जाते. ती लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारी दुसरी खेळाडू आहे, तिने १४ विकेट्सही घेतल्या आहेत. पेरी आरसीबीचा भाग होती पण या हंगामात ती खेळणार नसून हा फ्रँचायझीसाठी मोठा धक्का आहे. २०२४ च्या हंगामात पेरीने मुंबई इंडियन्सविरुद्ध १५ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. ही स्पर्धेतील कोणत्याही गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी आहे.
हे ही वाचा..
‘लँड फॉर जॉब घोटाळा’ प्रकरणात लालू यादवांसह कुटुंबियांविरोधात आरोप निश्चित करा
“डॅनिश भूभागावर आक्रमण केले तर सैन्य थेट गोळीबार करेल!”
“करार झाला होता, पण पंतप्रधान मोदींनी फोन केला नाही”
खोमेनी राजवटीविरोधातील निदर्शेने तीव्र; इंटरनेट, टेलिफोन लाईन्स बंद
टॉप खेळाडू
सिवर-ब्रंट टॉप स्कोरर, मॅथ्यूजच्या नावावर सर्वाधिक विकेट्स
मुंबईच्या नॅटली सिवर- ब्रंटने सर्वाधिक धावा केल्या आहेत. तिच्या नावावर २९ सामन्यांमध्ये १०२७ धावा आहेत. तर, हेली मॅथ्यूजने सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. तिच्या नावावर २९ सामन्यांमध्ये ४१ विकेट्स आहेत.
बंगळूरूकडून सर्वाधिक धावा स्मृतीच्या
बंगळूरूकडून सर्वाधिक धावा कर्णधार स्मृती मंधानाने केल्या आहेत. तिच्या नावावर २६ सामन्यांत ६४६ धावा आहेत. तर, श्रेयांका पाटीलने आरसीबीकडून सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत.
