जर्मनीत ट्रेन रुळावरून घसरली, तिघांचा मृत्यू, अनेक जखमी!

अपघातादरम्यान ट्रेनमध्ये होते १०० प्रवासी

जर्मनीत ट्रेन रुळावरून घसरली, तिघांचा मृत्यू, अनेक जखमी!

एएफपीच्या वृत्तानुसार, जर्मनीच्या नैऋत्येकडील बाडेन-व्रटेमबर्ग राज्यात झालेल्या रेल्वे अपघातात किमान तीन जणांचा मृत्यू झाला आहे आणि ३४ जण जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (२७ जुलै) संध्याकाळी ६.१० वाजता (स्थानिक  वेळेनुसार) फ्रेंच सीमेजवळील बिबेराच जिल्ह्यात घडली. 

जर्मन माध्यमांनुसार, ड्यूश बान द्वारे (जर्मनीची राष्ट्रीय रेल्वे कंपनी) चालवली जाणारी एक प्रादेशिक एक्सप्रेस ट्रेन सिग्मरिंगेन ते उल्म पर्यंत प्रवास करत असताना रुळावरून घसरली. स्टुटगार्टमधील संघीय पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, “ड्यूश बान रीजनल एक्सप्रेस ट्रेनचे दोन डबे रुळावरून घसरले.”

अपघात झाला तेव्हा ट्रेनमध्ये १०० लोक होते. अग्निशमन दल आणि बचाव पथकांसह आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या आणि बचावकार्य सुरु केले. याचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. रुळावरून घसरण्याची तीव्रता इतकी मोठी होती की ट्रेनचे काही भाग रुळावरून खाली पडले आणि आजूबाजूच्या जंगलात गेले. एका डब्याचे छत फाटलेले दिसले. 

हे ही वाचा  : 

संसदेत आजपासून ‘ऑपरेशन सिंदूर’ वर चर्चा, शशी थरूर बोलण्याची शक्यता कमी!

माकडांनी विजेच्या तारेवर मारली उडी, विजेच्या धक्क्याने चेंगराचेंगरी, २ भाविकांचा मृत्यू!

मुहूर्त ठरला : मराठवाड्यातील काँग्रेस नेते भाजपात प्रवेश करणार

Manchester Test Match: इंग्लंडची ३११ धावांची आघाडी निष्प्रभ ठरली

जर्मन चांसलर फ्रेडरिक मर्झ म्हणाले की ते परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “बिबेराच जिल्ह्यातील रेल्वे अपघाताने मला धक्का बसला आहे. मी गृहमंत्री आणि वाहतूक मंत्र्यांच्या जवळच्या संपर्कात आहे आणि त्यांना सर्व उपलब्ध मार्गांनी बचाव दलांना मदत करण्यास सांगितले आहे. आम्ही पीडितांबद्दल शोक व्यक्त करतो. मी त्यांच्या नातेवाईकांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो.”

मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे रेल्वे अपघात झाला का, याचा तपास अधिकारी करत आहेत. बाडेन-वर्टेमबर्ग गृहमंत्री थॉमस स्ट्रॉबल (६५, सीडीयू) यांनी अपघातस्थळी पत्रकारांना सांगितले की, “येथे मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे मुसळधार पाऊस आणि त्यासोबतच भूस्खलन हे देखील कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही.”

Exit mobile version