आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांमध्ये प्रचंड वाढत आहे. जो कोणी हा चित्रपट पाहतो आहे, तो त्याचे कौतुक केल्याशिवाय राहत नाही. अभिनेता अनुपम खेर यांनीही या चित्रपटाची स्तुती केली असून या चित्रपटाला प्रचारकी चित्रपट म्हणणाऱ्यांच्या लोकांच्या तोंडावर ही जोरदार चपराक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
अनुपम खेर यांनी ‘धुरंधर’च्या यशाबद्दल आणि चित्रपटाला प्रोपगंडाचा शिक्का मारणाऱ्यांबद्दल मोकळेपणाने मत व्यक्त केले आहे. ते या चित्रपटाचा भाग नसले तरी, चित्रपटाच्या प्रचंड यशामुळे ते अत्यंत आनंदी आहेत. त्यांच्या मते, या चित्रपटाने हिंदी सिनेमाला एक नवी दिशा दाखवली आहे.
एका व्हिडिओमध्ये ते म्हणाले, “माझा या चित्रपटाशी थेट काहीही संबंध नाही, पण हा चित्रपट इतका यशस्वी ठरत आहे की देश-विदेशातून लोक मला फोन करून ‘धुरंधर’बद्दल विचारत आहेत. एक अभिनेता म्हणून हे माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. पण त्याहूनही जास्त आनंद याचा आहे की काही लोकांनी या चित्रपटाला प्रोपगंडा ठरवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते यात अपयशी ठरले.”
आपले ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ हे चित्रपट आठवत ते म्हणाले की, “‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ला काही लोकांनी प्रोपगंडा ठरवले होते, जे माझ्यासाठी वेदनादायक होते. ‘द काश्मीर फाइल्स’च्या बाबतीतही हेच घडले. पण ‘धुरंधर’ने प्रोपगंडा म्हणणाऱ्यांच्या तोंडावर जोरदार चपराक मारली आहे. माझ्या ४१ वर्षांच्या कारकिर्दीत मी अनेक मैलाचा दगड ठरलेले चित्रपट पाहिले आहेत, पण खूप काळानंतर ‘धुरंधर’ने हिंदी सिनेमाला नवी दिशा दिली आहे. या चित्रपटामुळे आपल्यामध्ये पुन्हा नव्या जोमाने काम करण्याची ऊर्जा निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
इस्लामी जमावाची संगीत कार्यक्रमावर दगडफेक; २० जण जखमी
पाकिस्तानात नाही राहायचे, गेल्या वर्षी ७ लाख लोकांनी सोडला देश
मशिदीबाहेर ४५ वर्षे पडलेले दगड हटवल्यावर फोडली पोलिसांची डोकी
अमेरिकेतील एच–१बी नियमांतील बदल : भारतीय टेक कर्मचाऱ्यांमध्ये चिंता
अनुपम खेर यांच्या या व्हिडिओवर दिग्दर्शक आदित्य धर यांनीही प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला. त्यांनी कमेंटमध्ये लिहिले, “हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या शब्दांमधील प्रामाणिक भावना आणि उदारता स्पष्टपणे दिसते. अशा महान चित्रपटांच्या यादीत माझे नाव येणे हे माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मी प्रामाणिक, निर्भय आणि काळाच्या कसोटीवर टिकणारे चित्रपट बनवत राहू इच्छितो.”
अनुपम खेर यांचा ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता आणि आपला खर्चही वसूल करू शकला नव्हता. ‘द काश्मीर फाइल्स’च्या बाबतीतही अशीच परिस्थिती होती. चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपटाची बाजू मांडण्यासाठी अनेक चर्चात्मक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता.
