‘स्वायत्त महाराष्ट्र’च्या नावाने देशद्रोही पोस्ट करणाऱ्या एक्स अकाऊंटवर बंदी घाला, अटक करा!

भाजपा नेते अतुल भातखळकर यांची मागणी 

‘स्वायत्त महाराष्ट्र’च्या नावाने देशद्रोही पोस्ट करणाऱ्या एक्स अकाऊंटवर बंदी घाला, अटक करा!

‘स्वायत्त महाराष्ट्र’च्या नावाने देशद्रोही पोस्ट करणाऱ्या एक्स अकाऊंटवर बंदी घालावी आणि या प्रकरणी संबंधितांना अटक करावी अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी काल (७ जुलै) विधानसभेत केली. ‘स्वायत्त महाराष्ट्र’ या एक्स अकाऊंटच्या पोस्टवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आणि याच्या पाठीमागे असणाऱ्यांचा शोध घेण्याची मागणी त्यांनी केली.

‘स्वायत्त महाराष्ट्र’ नावाचे एक्स अकाऊंट आहे आणि त्याचे १,७०० हून अधिक फॉलोवर्स आहेत. अकाऊंटच्या पोस्ट पाहिल्यातर त्या सरकार विरोधी, मराठी-अमराठी आणि द्वेष पसरवणाऱ्या असल्याचा दावा आमदार भातखळकर यांनी केला. यावेळी त्यांनी अकाऊंटबाबत सर्व माहिती सभागृहात दिली.

ते म्हणाले,  ‘स्वायत्त महाराष्ट्र’ या एक्स अकाऊंटवरुन दोन भाषिकांमध्ये, समाजांमध्ये द्वेष पसरवण्याचे काम चालवले जाते. एवढेच नाहीतर ‘स्वायत्त महाराष्ट्र’ या नावाखाली यांनी पोस्ट केली की, १९४७ साली महाराष्ट्र वेगळे राष्ट्र व्हायला हवे होते. अशा प्रकारच्या देशद्रोही पोस्ट या अकाऊंटवरुन केल्या जातात.

गृहविभागाने या अकाऊंटची सर्व चौकशी करावी अशी माझी मागणी आहे. तसेच या अकाऊंटच्या मागे, महाराष्ट्राला-मराठी माणसाला बदनाम करण्याचे, समाजामध्ये फुट पाडण्याचे, द्वेष पसरवण्याचे काम कोण करतयं, याची चौकशी व्हावी आणि ‘स्वायत्त महाराष्ट्र’ या अकाऊंटवर बंदी आणावी, अशी मागणी आमदार भातखळकर यांनी केली.

हे ही वाचा : 

काँग्रेसकडून आंबेडकर विरोधी वक्तव्य

छांगुर बाबावर मुख्यमंत्री योगी काय म्हणाले ?

नीलकंठ पक्ष्याचा महादेवांशी आहे जवळचा संबंध

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे विसरले राष्ट्रपतींची नावे!

ट्विट करत ते म्हणाले, यांना चिरडून टाका… स्वायत्त महाराष्ट्र नावाचे एक अकाउंट एक्सवर आहे. (पूर्वीचे ट्विटर). महाराष्ट्र हे १९४७ पासून स्वतंत्र राष्ट्र व्हायला हवं होतं, अशा प्रकारचे फुत्कार या अकाउंट वरून टाकले जातात. या प्रवृत्तीला चिरडून टाकलं पाहिजे. महायुती सरकारने तात्काळ या अकाउंट वर कारवाई करावी आणि संबंधितांना अटक करावी अशी माझी मागणी आहे.

Exit mobile version