बांगलादेशी आणि रोहिंग्या लोकांचा देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात शिरकाव झाल्याचे समोर आले, येत आहे. आतापर्यंत अनेक घुसखोरांना पकडून त्यांना देशातून हाकलण्यात आले आहे. अशा घुसखोरांना पकडण्यासाठी पोलिसांची शोधमोहीम सुरूच आहे. राज्यातही मोठ्या प्रमाणात अशी घुसखोरी झाली असून या लोकांना बेकायदेशीर जन्मप्रमाणपत्र दिल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
भाजपा नेत्याने आवाज उठवल्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये जन्मप्रमाणपत्र घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अनेकांना अटक झाली आहे, संशयित जन्म प्रमाणपत्रे रद्द केली गेली आहेत. याच दरम्यान, बीडमध्ये देखील जन्म प्रमाणपत्र घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कार्यालयाकडून २७०२ प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत. सोशल मिडियावर पोस्टकरत किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिली आहे.
काल (२५ ऑगस्ट) बीड आणि जालना येथे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व अन्य अधिकाऱ्या सोबत बैठक झाल्याचे सोमय्या यांनी सांगितले. याभेटीनंतर बीड जिल्ह्यात नायब तहसीलदारांनी बेकायदेशीर रित्या दिलेले २७०२ प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. त्यापैकी १६९८ मूळ ओरिजिनल प्रमाणपत्र परत घेण्यात आले असून राहिलेले १००४ प्रमाणपत्र १५ दिवसात परत घेतले जाणार असल्याचे सोमय्या यांनी पोस्टमध्ये सांगितले.
हे ही वाचा :
२६ फूट उंच सफरचंद गणेशमूर्ती कुठे आहे बघा..
जीतू पटवारी यांच्या वक्तव्यावर सुधांशु त्रिवेदी भडकले
पंतप्रधान मोदी शिखर बैठक, एससीओ बैठकीत सहभागी होणार
हेड कॉन्स्टेबलला लाख रुपयांची लाच घेताना अटक
जन्म प्रमाणपत्र घोटाळा
काल बीड आणि जालना येथे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व अन्य अधिकाऱ्या सोबत बैठक झाली.
बीड जिल्ह्यात नायब तहसीलदारांनी बेकायदेशीर रित्या दिलेले 2702 प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे.
त्यापैकी 1698 मूळ original प्रमाणपत्र परत घेण्यात आले असून राहिलेले 1004… pic.twitter.com/rr335PcVJN
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 26, 2025
“अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी व अचलपूर येथील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी पोलीसांची SIT”
माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने बनावटी कागदपत्रे, खोटे शपथपत्राद्वारे फसवणुकीने जन्म प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या अर्जदारांवर/ जन्म प्रमाणपत्र घोटाळ्या संदर्भात अंजनगाव… pic.twitter.com/co7WfaVNcy
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 26, 2025
