भारतीय जनता पक्षाचे नेते माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांचा ललिता पंचमीदिवशी आयोजित तिथीनुसार वाढवदिवस अत्यंत उत्साहात साजरा झाला. षष्ठ्यब्दीपूर्ति निमित्त देवधर यांच्या मित्र परिवाराकडून या सोहळ्याचे आजोजन करण्यात आले होते. संन्यास आश्रम, विलेपार्ले येथे हा सोहळा पार पडला.
सुनील देवधर यांचे मित्र, भारतीय जनता पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, माय होम इंडिया या संस्थेचे पदाधिकारी यांनी देवधर यांना शुभेच्छा दिल्या. सकाळपासून देवधर यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या मित्रांनी आश्रम परिसरात गर्दी केली होती.
हेही वाचा..
… म्हणून काँग्रेस नेत्याला ठोठावला १.२४ अब्ज रुपयांचा दंड!
राज कुंद्रावर ईडीकडून १५० कोटींच्या बिटकॉइन घोटाळा प्रकरणी आरोपपत्र दाखल
सूरत ते बिलीमोरा बुलेट ट्रेन धावणार लवकरच
शिक्षकांवर कारवाईचा निर्णय घेणार निवडणूक आयोग
समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्यात सहभागी झाले होते. वाढदिवसानिमित्त महिला पुरोहितांकडून विशेष पूजा संपन्न झाली. विशेष म्हणजे यामध्ये दलित समाजातील महिला पुरोहित सहभागी होत्या. संन्यास आश्रमाचे महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी जी व स्वामी जितेंद्रानंद सरस्वती जी यांचेही देवधर यांनी आशीर्वाद घेतले.
