मुंबई महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी प्रभाकर शिंदेंची निवड

भाजपाकडून झाला निर्णय

मुंबई महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी प्रभाकर शिंदेंची निवड

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांची नियुक्ती झाल्यानंतर आता विविध समित्या स्थापन करण्यास सुरुवात होणार आहे. त्यात स्थायी समिती हा महानगरपालिकेतील सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. त्याचे अध्यक्षपद अनुभवी आणि ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांना देण्याचा निर्णय झाला आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी मकरंद नार्वेकर आणि प्रकाश दरेकर यांच्या नावांचीही चर्चा होती पण विरोधी पक्षनेते म्हणून याआधी ज्यांनी आपली कारकीर्द यशस्वीरित्या पूर्ण केली अशा प्रभाकर शिंदे यांची निवड करण्यात आली. प्रभाकर शिंदे हे याआधी शिवसेनेत होते. तिथेही त्यांनी महत्त्वाची पदे भूषविली होती. शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. प्रभाकर शिंदे यांच्या निवडीमुळे प्रशासकीय कामात भाजपाची पकड आणखी मजबूत होणार आहे, असे म्हटले जात आहे.

हे ही वाचा:

घरगुती काम करणारे मिळतील आता एका क्लिकवर

वडाळ्यात होणार राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग

पाकिस्तानी हॉकीपटूंना सामन्याआधी घासावी लागली भांडी

एआय समिटमध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचाई भेटले मोदींना

महापौर पदाच्या शर्यतीत ज्यांच्या नावाची चर्चा होती, अशा राजेश्री शिरवडकर यांची शिक्षण समितीच्या अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे. हे उमेदवार आपले अर्ज सादर करणार आहेत.

सुधार समितीत शिवसेनेकडून संध्या दोषी यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे तर शिवसेनेकडून बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी तृष्णा विश्वासराव यांना संधी मिळेल.

Exit mobile version