पुणे जिल्ह्यात रविवारी एक भीषण दुर्घटना घडली. मावळ तालुक्यातील कुंदमाळा भागात इंद्रायणी नदीवरचा जुना पूल अचानक कोसळल्याने अनेक पर्यटक नदीत वाहून गेले. प्राथमिक माहितीनुसार, २५ ते ३० पर्यटक वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, दोन जण मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहितीही हाती येत आहे.
एकूण ४० लोक पूल पडल्यावर वाहून गेले होते, त्यातील ३८ जणांना वाचवण्यात यश आले असून २ जणांना प्राण गमवावे लागले. राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख जाहीर केले आहेत.
ही घटना तळेगाव दाभाडे जवळील कुंदमाळा या प्रसिद्ध पर्यटनस्थळी घडली. रविवार असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक आले होते. इंद्रायणी नदीवरील पूल फार जुना आणि कमकुवत झाला होता, अशी माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.
सदर दुर्घटना सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. २०० हून अधिक पर्यटक पुलावर उपस्थित होते. पुल कोसळल्यानंतर अनेकजण नदीच्या प्रवाहात अडकले. २०-२५ जणांना स्थानिक नागरिकांनी सुरक्षित बाहेर काढले. ४-५ जण अद्याप बेपत्ता असून, शोधकार्य सुरू आहे. हाइड्राक्रेन मागवण्यात आली आहे जेणेकरून अडकलेल्या लोकांना बाहेर काढता येईल.
मोदींनी घेतली दखल
दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेविषयी चिंता प्रकट केली असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून मोदींनी घटनेची माहिती घेतली आणि मदतीचे आश्वासन दिले.
हे ही वाचा:
तणावाशी झुंजणाऱ्या विश्वाचा एकमेव आधार आहे ‘योग’
माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे डीएनए नमुने जुळले
बंगळुरू चेंगराचेंगरीसारख्या घटना टाळण्यासाठी बीसीसीआयने स्थापन केली समिती
विश्वविख्यात जगन्नाथ रथयात्रेची तयारी जोरदार
स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपत्ती निवारण पथक घटनास्थळी दाखल झाले असून NDRF च्या दोन टीम्स सुद्धा तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “कुंदमाळा (मावळ) येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. काही नागरिक नदीत वाहून गेले असावेत, अशी भीती आहे. मी प्रशासनाशी संपर्क साधला असून, सर्वतोपरी मदत केली जात आहे. नागरिकांनी पावसाळ्यात पर्यटन करताना सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करावे.”
पावसामुळे वाढलेले संकट:
-
मावळ तालुक्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस
-
त्यामुळे इंद्रायणी नदीचे पाणी पातळी खूप वाढलेली आहे
-
त्यामुळे नदीचा प्रवाह अत्यंत वेगवान आणि धोकादायक
