ममतांनी सीमेवरील कुंपणासाठी जमीन नाकारली; म्हणून घुसखोरी!

पश्चिम बंगाल विधानसभा विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांची टीका

ममतांनी सीमेवरील कुंपणासाठी जमीन नाकारली; म्हणून घुसखोरी!

भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलेल्या भाषणात अनेक मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी बेकायदेशीर घूसखोरांविषयी त्यांनी भाष्य केलं. “गैरकायदेशीर स्थलांतर सहन करणार नाही,” असे पंतप्रधान म्हणाले आणि उच्च‑स्तरीय ‘डेमोग्राफिक मिशन’ सुरू करण्याची घोषणा केली, ज्याचा उद्देश घुसखोरीमुळे होणाऱ्या संभाव्य सामाजिक, आर्थिक आणि सुरक्षा‑धोक्यांना तोंड देणे आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून पश्चिम बंगाल विधानसभा विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री ममता सरकारवर टीका केली.

पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील घटाल येथील पूरग्रस्त भागांना भेट दिल्यानंतर सुवेंदू अधिकारी एएनआयशी संवाद साधला. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विशेष पुढाकाराने आज देशात लोकसंख्येतील बदलांवर सर्वेक्षण करण्याची घोषणा झाली आहे आणि देशातून घुसखोरांना हाकलण्याचा इशाराही त्यांनी दिला, हे आमच्यासाठी सर्वात मोठे यश आहे. राष्ट्र प्रथम, आपण आपल्या देशाचे रक्षण केले पाहिजे.

हे ही वाचा : 

स्वातंत्र्य संग्रामात १५ मंदिरांनी घेतला होता सक्रीय सहभाग

भारत अवकाश महासत्ता बनण्याच्या मार्गावर, गेल्या पाच वर्षांत उद्योग अनेक पटींनी वाढले: तज्ज्ञ

भारतातील १० पैकी ४ लोकांना मधुमेहाचा धोका माहित नाही, त्याची लक्षणे आणि तो कसा टाळायचा हे जाणून घ्या

फलटण : ध्वजारोहणानंतर युवकाचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ५४० किलोमीटर सीमा कुंपणासाठी जमीन दिली नाही, त्यामुळे रोहिंग्या आणि बांगलादेशातील मुस्लिम घुसखोर आपल्या भूमीवर अतिक्रमण करत आहेत. आदिवासी भागांमध्ये हे बेकायदेशीर घुसखोर आदिवासींची जमीन बळकावत आहेत. पंतप्रधान मोदींनी कलम ३७० हटवले. त्यांच्या कार्यकाळात अयोध्येत राम मंदिर उभे राहिले. तिहेरी तलाक रद्द करण्यात आला. वक्फ विधेयक त्यांच्या नेतृत्वाखाली मंजूर झाले. हे पंतप्रधान भारतात ‘एक राष्ट्र, एक निवडणूक आणतील,’ ‘मोदी है तो मुमकीन है'”

Exit mobile version