राजकोट गेमिंग झोनमधील आगीत मालकाचाही मृत्यू!

आईच्या डीएनए चाचणीवरून झाले सिद्ध

राजकोट गेमिंग झोनमधील आगीत मालकाचाही मृत्यू!

गुजरातच्या राजकोटमध्ये गेम झोनमध्ये लागलेल्या आगीत या गेमझोनचा एक मालक प्रकाश हिरन याचाही होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत लहान मुलांसह २७ जणांचा मृत्यू झाला होता. आग लागली तेव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये हिरन हे घटनास्थळी दिसले होते. त्यामुळे आग लागली तेव्हा ते घटनास्थळी होते, हे सिद्ध झाले होते. त्यानंतर त्यांची गाडीही आगीच्या ठिकाणी आढळली होती.

हिरनचा भाऊ जितेंद्र याने ते हरवल्याची तक्रार दाखल केली होती, तसेच आग लागली तेव्हा त्याचा भाऊ गेमिंग झोनच्या आत होता, असा दावाही त्याने केला होता.फॉरेन्सिक विभागाने त्यांच्या आईचे डीएनए नमुने घेतले होते आणि मंगळवारी त्यांनी प्रकाश यांचा मृत्यू आगीत झाल्याचा दावा केला. गेम झोनला लागलेल्या आगीत अनेक मृतदेह ओळखीच्या पलीकडे जळाले होते. पोलिसांनी मृतदेहांच्या ओळखीसाठी डीएनए चाचणी केली होती. प्रकाश यांच्या आईचा डीएनए अहवाल आता आला असून या आगीत प्रकाश यांचा मृत्यू झाल्याचे सिद्ध झाले आहे.

हे ही वाचा:

‘पाकिस्तानने भारताशी केलेल्या १९९९च्या लाहोर कराराचे उल्लंघन केले’

पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे, ३ कोटी रुपये जप्त!

केजरीवाल २ जून रोजी पुन्हा तुरुंगात; सर्वोच्च न्यायालयाने दिला दणका!

पाकिस्तानला पुन्हा इंडी आघाडीचा पुळका; म्हणे पंतप्रधान मोदींचा पराभव व्हावा ही प्रत्येक पाकिस्तानीची इच्छा!

रेसवे इंटरप्रायझेसमध्ये भागीदार असलेल्या प्रकाश यांच्याकडे गेमिंग झोनमधील ६० टक्के मालकी हक्क होता. त्यामुळे गुजरात पोलिसांनी त्याचे नाव आरोपी म्हणून नोंदवले होते. पोलिसांनी एफआयआरमध्ये सहा जणांना आरोपी केले आहे. त्यामध्ये धवल एंटरप्रायझेसचे मालक धवल ठक्कर, रेसवे एंटरप्रायझेसचे भागीदार अशोकसिंह जाडेजा, किरीटसिंह जाडेजा, प्रकाश हिरन, युवराजसिंह सोलंकी आणि राहुल राठोड यांचा समावेश आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी ठक्कर घटनेनंतर फरार होता आणि त्याला राजस्थानमधून अटक केली होती. तो राजस्थानमध्ये एका नातेवाइकाच्या घरी लपला होता. युवराजसिंह सोलंकी, नितीन जैन आणि राहुल राठोड याला दोन आठवड्यांसाठी पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Exit mobile version