उत्तर प्रदेशातील बरेली शहरात ‘आय लव्ह मुहम्मद’ पोस्टर प्रकरणावरून उसळलेल्या वादाने हिंसक वळण घेतले असून, शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. २६ सप्टेंबर रोजी अला हजरत दर्गा आणि आयएमसीचे प्रमुख मौलाना तौकीर रझा खान यांच्या निवासस्थानाबाहेर लोकांचा एक गट पोस्टर फलकांसह जमला होता. या निदर्शनांदरम्यान काही आंदोलनकर्त्यांकडून दगडफेकही करण्यात आली, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.
याप्रकरणी पोलिसांनी मौलाना मोहसीन रझा यांना अटक केली असून, त्यानंतर उत्तर प्रदेश महानगरपालिकेने मंगळवारी (३० सप्टेंबर) त्यांच्या मालमत्तेवर बुलडोझर कारवाई सुरु केली. कारवाईचा व्हिडीओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये पोलिसांच्या बंदोबस्तात पालिकेचे बुलडोजर मौलाना मोहसीन रझा यांची मालमत्ता भुईसपाट करताना दिसत आहेत.
दरम्यान, शुक्रवारी झालेल्या नमाजानंतर निदर्शने अधिक तीव्र झाली, आणि त्यात हिंसक प्रकार घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर, बरेली शहरात मंगळवारी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. २६ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनांनंतर शहरात सामाजिक सलोखा बिघडू नये म्हणून प्रशासन सतर्क असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे आणि काही भागांत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
#WATCH | Bareilly, UP | Bulldozer action on Maulana Mohsin Raza's property following his arrest in connection with the 26 September's protests by a group of people who gathered outside Ala Hazrat Dargah & IMC chief Maulana Tauqeer Raza Khan's house, holding 'I Love Mohammad'… pic.twitter.com/EZHXRbLEPU
— ANI (@ANI) September 30, 2025
