फुटबॉल विश्वातील प्रसिद्ध खेळाडू लिओनेल मेस्सी हा सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. कोलकात्यात मेस्सीचे भव्य स्वागत करण्यात आले. हजारोंच्या संख्येने चाहत्यांनी विमानतळावर गर्दी केली होती. यानंतर मेस्सी शनिवार, १३ डिसेंबर रोजी सॉल्ट लेक स्टेडियममध्ये दाखल झाला. मात्र, अवघ्या काही मिनिटांतच मेस्सी स्टेडियममधून निघून गेल्याने उपस्थित चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. संतप्त चाहत्यांनी मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला. काहींनी खुर्च्या आणि बाटल्या फेकत निषेध व्यक्त केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्टेडियममध्ये सुरुवातीला सन्मान सोहळा पार पडला, मात्र हा सोहळा अपेक्षेपेक्षा फारच कमी वेळेचा झाला. अवघ्या काही मिनिटांतच मेस्सी स्टेडियममधून निघून गेल्याने उपस्थित चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. मेस्सीला प्रत्यक्ष पाहण्यासाठी हजारो चाहते स्टेडियममध्ये जमले होते. तिकिटांसाठी हजारो रुपये खर्च केले होते. मात्र, मेस्सी मैदानात फार वेळ न थांबल्याने चाहत्यांचा भ्रमनिरास झाला. मेस्सी निघून गेल्यानंतर सॉल्ट लेक स्टेडियममध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त चाहत्यांनी मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला. काहींनी खुर्च्या आणि बाटल्या फेकत निषेध व्यक्त केला.
#WATCH | Kolkata, West Bengal: Angry fans threw bottles and chairs from the stands at Kolkata's Salt Lake Stadium
Star footballer Lionel Messi has left the Salt Lake Stadium in Kolkata.
More details awaited. pic.twitter.com/mcxi6YROyr
— ANI (@ANI) December 13, 2025
हे ही वाचा:
उत्तर प्रदेशातील ‘जामतारा’; मथुरेतील चार गावांमधून ४२ जणांना अटक
तिरुप्परनकुंद्रम कार्तिक दीप प्रज्वलनाला ‘उबाठा’चा का आहे विरोध?
घुसखोरीच्या प्रयत्नात असताना जैश संबंधित दहशतवाद्याला अटक
कॅनडामध्ये गोळीबार प्रकरणी तीन भारतीय वंशाच्या ट्रकचालकांना अटक
या घटनेनंतर चाहत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. एका चाहत्याने सांगितले, “ही खूप निराशाजनक घटना आहे. मेस्सी फक्त १० मिनिटांसाठी आला. त्याच्याभोवती फक्त राजकारणी आणि मंत्री होते. आम्हाला काहीच दिसले नाही. त्याने त्याच्या खेळाची एक झलकही दाखवली नाही. इतके पैसे आणि वेळ वाया गेला.” तर दुसऱ्या चाहत्याने म्हटले, “मेस्सीभोवती फक्त राजकारणी आणि अभिनेते होते. मग आम्हाला का बोलावले? आम्ही १२,००० रुपयांचे तिकीट घेतले, पण त्याचा चेहराही नीट दिसला नाही.”
