उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील पूजा सिंह यश हे या विचाराचे जिवंत उदाहरण आहे की योग्य संधी आणि योग्य मार्गदर्शन मिळाले, तर कुठलाही विद्यार्थी मोठी उंची गाठू शकतो. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पूजाने मुख्यमंत्री अभ्युदय योजनेच्या माध्यमातून तो मुकाम गाठला, जो कधी तिच्यासाठी दूरचं स्वप्न वाटत होतं. पूजा म्हणते “मुख्यमंत्री अभ्युदय योजनेनं माझ्या स्वप्नांना दिशा दिली.” पूजाचं आयुष्य संघर्ष आणि दृढ संकल्पाचं प्रतीक आहे. तिचे वडील शेती करतात आणि मर्यादित उत्पन्नात कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
लहानपणापासूनच पूजाने अभाव अगदी जवळून पाहिला आहे. पण या परिस्थितींनी तिला कमकुवत न करता तिची इच्छाशक्ती अधिक मजबूत केली. शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचं भविष्य घडवायचं आणि आपल्या कुटुंबाचं व गावाचं नाव उज्वल करायचं, असा तिनं निर्धार केला होता. पूजाने दिल्लीहून बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं होतं. मात्र आर्थिक अडचणींमुळे दिल्लीसारख्या महानगरात राहून पुढचं शिक्षण घेणं शक्य झालं नाही. त्यामुळे पूजा पुन्हा जौनपूरला परतली आणि तेथील टी.डी. कॉलेजमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. हाच तो काळ होता जेव्हा आर्थिक मर्यादा तिच्या स्वप्नांच्या आड येऊ शकल्या असत्या, पण राज्य सरकारची मुख्यमंत्री अभ्युदय योजना तिच्यासाठी संजीवनी ठरली.
हेही वाचा..
आयटी क्षेत्राच्या महसुलात ४–५ टक्के वाढीची अपेक्षा
भात उत्पादनात भारताने चीनला मागे टाकले
सरकारने बांगलादेशातील हिंदूंना वाचवावे
प्रेयसीची हत्या करून अमेरिकेतून पळून गेलेल्या भारतीयाला तामिळनाडूमध्ये अटक
वर्ष २०२४ मध्ये पूजाला मुख्यमंत्री अभ्युदय योजनेची माहिती मिळाली. मे २०२४ मध्ये तिनं अर्ज केला आणि जून २०२४ पासून ती अभ्युदय योजनेअंतर्गत मोफत कोचिंगमध्ये सहभागी झाली. हीच ती योजना आहे जी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील होतकरू विद्यार्थ्यांसाठी सुरू केली, जेणेकरून आर्थिक स्थिती त्यांच्या प्रतिभेच्या आड येऊ नये. पूजा सांगते की अभ्युदय योजनेअंतर्गत तिला अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन मिळालं. नियमित वर्ग, व्यवस्थित अभ्यासक्रम आणि सातत्यपूर्ण सराव यामुळे तिच्या तयारीला योग्य दिशा मिळाली.
कॉलेजनंतर संध्याकाळी दीड तासांचे वर्ग पूजा घेत असे. शिक्षक विषय सोप्या भाषेत समजावून सांगत आणि वारंवार पुनरावृत्ती व टिपांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची पायाभरणी मजबूत करत. पूजा म्हणते की खासगी कोचिंग संस्थेत शिकायला गेली असती तर सुमारे १ ते १.५ लाख रुपयांचा खर्च आला असता, जो तिच्या कुटुंबासाठी अशक्य होता. अभ्युदय योजनेनं हा आर्थिक भार पूर्णपणे दूर केला. मोफत आणि दर्जेदार शिक्षणामुळे तिला नवा आत्मविश्वास मिळाला आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळाली.
अभ्युदय योजनेच्या मदतीनंतर पूजाच्या समर्पित तयारीचं फलित असं की तिनं पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी–सीएपीएफ परीक्षा उत्तीर्ण केली आणि असिस्टंट कमांडंट झाली. ही यशोगाथा केवळ वैयक्तिक यशापुरती मर्यादित नाही, तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारच्या धोरणांच्या यशाचंही प्रतीक आहे. पूजाच्या यशामुळे तिच्या कुटुंबात, गावात आणि संपूर्ण परिसरात अभिमानाची भावना आहे. पूजा सिंह म्हणते की मुख्यमंत्री अभ्युदय योजना ही त्या हजारो तरुणांसाठी आशेची किरण आहे, जे संसाधनांच्या अभावामुळे आपली स्वप्नं गाडून टाकतात. समाजकल्याण विभागामार्फत चालवली जाणारी ही योजना आयएएस, पीसीएस, नीट, जेईई आणि सीएपीएफसारख्या परीक्षांची तयारी गावोगाव पोहोचवते.
