“मूर्तीपूजेवर बंदीचा हवाला देऊन राष्ट्रीय प्रतीकाचा अपमान, देश फोडण्याचा प्रकार”

शादाब शम्स यांची प्रतिक्रिया, आमदार तन्वीर सादिक यांचाही निषेध 

“मूर्तीपूजेवर बंदीचा हवाला देऊन राष्ट्रीय प्रतीकाचा अपमान, देश फोडण्याचा प्रकार”

उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी हजरतबल दर्ग्याच्या नूतनीकरणानंतर बसवण्यात आलेल्या फलकावरील राष्ट्रीय प्रतीकाची तोडफोड करणाऱ्या जमावावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. शम्स म्हणाले, “इस्लाममध्ये मूर्तीपूजेवर बंदी असल्याचे कारण देत राष्ट्रीय प्रतीकाचा अपमान करणाऱ्या व्यक्ती हे देश फोडण्याचे काम करत आहेत. हे विचार दूषित असून, देशाच्या एकतेविरोधात आहेत. आम्ही या प्रकारे पसरवण्यात येणाऱ्या गलिच्छ विचारांची निषेध करतो.”

ते पुढे म्हणाले, “देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणजे तुम्ही माझ्या राष्ट्रीय प्रतीकांचा अपमान कराल का? हे आम्ही कोणत्याही किंमतीवर सहन करणार नाही. अशा लोकांविरुद्ध कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी माझी मागणी आहे.”

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला अशा लोकांना पाठिंबा देऊन गैरवर्तन दाखवत आहेत. मेहबूबा मुफ्ती देखील त्यांना पाठिंबा देत आहेत. यावरून हे लोक किती नीच विचारसरणीचे आहेत हे दिसून येते… या गुंडगिरीचा इलाज लवकरच होणार आहे, ते पुढे म्हणाले.

राष्ट्रीय प्रतीकाची नासधूस करणाऱ्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार तन्वीर सादिक म्हणाले, “जम्मू-काश्मीर वक्फ बोर्ड बरखास्तच केलं पाहिजे. कारण जो कोणी जम्मू-काश्मीरच्या सामाजिक सौहार्दाला धोका पोहोचवतो आणि धार्मिक भावना दुखावतो, त्याला या पदावर बसण्याचा कोणताही अधिकार नाही.”

ते पुढे म्हणाले, “या प्रकरणी पोलीस कारवाई झालीच पाहिजे. आम्ही अशोक चक्राचा पूर्ण सन्मान करतो, पण या प्रतीकाचा गैरवापर वक्फ बोर्डाच्या उपाध्यक्षांनी केला आहे. त्यामुळे आम्ही विधानसभा समितीचीही मागणी करत आहोत. १-२ दिवसांत आम्ही अध्यक्षांना कळवणार असून, संपूर्ण माहिती उघड करणार आहोत.”

हे ही वाचा : 

बलुच नागरिकांच्या हत्येनंतर मानवाधिकार संघटना संतापली

भाजपच्या महिला मोर्चाने मोदींबद्दल केलेल्या अभद्र भाषेचा केला निषेध

मानव तस्करी करणाऱ्या टोळीचा भंडाफोड

जीएसटी : खाद्य-प्रक्रिया क्षेत्राला सर्वाधिक लाभ

तन्वीर सादिक यांनी स्पष्ट केलं की, “नॅशनल कॉन्फरन्सने कधीच हिंसाचाराला पाठिंबा दिला नाही, मात्र धार्मिक भावना दुखावल्यामुळे जनतेचा प्रतिसाद स्वाभाविक होता.” या प्रकरणी वक्फ बोर्डाविरुद्ध नाराजीचं वातावरण असून, सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या कोणत्याही कृतीवर कठोर पावलं उचलण्याची मागणी जोर धरत आहे. या घटनेने देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, राष्ट्रीय प्रतीकांचा अपमान हा गंभीर गुन्हा मानला जातो. त्यामुळे या प्रकरणात कायदेशीर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Exit mobile version