जयेश मेस्त्री यांच्या “जादूचा दिवा” या बालनाट्य पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार (बाल वाङ्मय भा. रा. भागवत पुरस्कार) जाहीर झाला आहे.
मराठी साहित्यातील उत्कृष्ट वाङमयासाठी यशवंतराव चव्हाण राज्य पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. यात विविध विषयातील ३५ पुरस्कार जाहीर झाले. यात प्रौढ वाङमय, बाल वाङमय, प्रथम प्रकाशन आणि सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्काराचा समावेश आहे.
हे ही वाचा:
जानेवारीत बँकांच्या कर्जवाटपात १४ टक्क्यांहून अधिक वाढ
मायक्रोसॉफ्टच्या व्यवसाय पद्धतींची अमेरिकेत चौकशी सुरू
काँग्रेसचे सपकाळ म्हणतात, शिवाजी महाराज-टिपू सुलतान हे समकक्ष!
मालेगावच्या उपमहापौरांनी लावला टिपू सुलतानाचा फोटो, वादानंतर हटवला
याबाबत जयेश मेस्त्री यांनी प्रतिक्रिया दिली की, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. भा. रा. भागवत यांच्या नावाने पुरस्कार मिळाल्याने माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. मी यापुढे आणखी चांगल्या प्रकारे रंगमंच व रसिकांची सेवा करण्याचा प्रयत्न करेन. २० वर्षांच्या लेखन कार्याचा हा सन्मान आहे. व्यास पब्लिकेशनचे आणि मला लिहिते करणाऱ्या सर्वांचे आभार. माझ्या प्रत्येक लेखनाचे पहिले वाचक व समीक्षक पत्नी व चिरंजीव यांचेही आभार.
