कर्नाटकातील धर्मस्थळ वाद प्रकरणी गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी विधानसभेत उत्तर दिल्यानंतर भाजपचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस व विधान परिषद सदस्य सी.टी. रवि यांनी पलटवार केला. त्यांनी सरकारवर कारवाई न करण्याचा आरोप करत पुन्हा एकदा धर्मस्थळाबाबत द्वेष पसरवला जात असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेत बोलताना सी.टी. रवि म्हणाले, “गृहमंत्री विधानसभेत बोलले, पण कारवाई केली आहे का? सरकारने कोणतीही कारवाई केली आहे का? यूट्यूबवरून द्वेष पसरवला गेला, त्याविरुद्ध कारवाई झाली आहे का? जर कारवाई झाली नसेल तर त्यामागचे कारण काय? सरकारने स्पष्ट सांगावे की कोणाच्या दबावाखाली कारवाई होत नाही. जर दबाव आहे तर तो कुणाचा आहे हेही स्पष्ट करावे.”
ते पुढे म्हणाले, “एखाद्या व्यक्तीच्या तक्रारीवरून तपासाला सुरुवात झाली. १७ ठिकाणी खुदाई झाली. त्यातून काय निष्पन्न झाले? रिपोर्ट येण्याआधी काही यूट्यूबर्सनी धर्मस्थळाबाबत द्वेष पसरवला. धर्माधिकारींच्या कुटुंबाबद्दल खोटे आरोप करून अपप्रचार केला. त्यांच्यावर काय कारवाई झाली? सरकारने हे स्पष्ट करणे गरजेचे आहे. दरम्यान, बिहारमध्ये काँग्रेसचे खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मतदार अधिकार यात्रेवर भाष्य करताना त्यांनी म्हटले, “राहुल गांधींची पद्धत ‘हिट अँड रन’ अशीच आहे. त्यांच्याकडे खरोखर पुरावे आणि संविधानावर विश्वास असता, तर आतापर्यंत त्यांनी तक्रार केली असती. पण त्यांनी तसे केले नाही. याचा अर्थ राहुल गांधींकडे पुरावे नाहीत. ते केवळ खोटे आरोप करून एक कथानक (नॅरेटिव्ह) तयार करत आहेत. बिहारमध्येही ते हेच कथानक पसरवण्यासाठी गेले आहेत.
हेही वाचा..
बेरोजगारी दर घसरून ५.२ टक्क्यांवर
भारतातून आय फोनची निर्यात ६३ टक्क्यांनी वाढली
पंतप्रधान मोदी यांनी सी.पी. राधाकृष्णन यांची एनडीए खासदारांशी करून दिली ओळख
पंतप्रधान मोदी यांनी मारल्या अंतराळवीर शुभांशु शुक्लांशी गप्पा
सी.टी. रवि म्हणाले, “ते जर निवडणूक हरले तर ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर आरोप करतील. हे त्यांचे जुने धोरण आहे. त्यांच्या जवळ सदैव रेडीमेड आरोप तयार असतात. बिहारमध्येही ते आपला रेडीमेड आरोप आधीच तयार करत आहेत.”
