भारताचा आफ्रिकेवर ‘यशस्वी’ मालिकाविजय!

भारताचा आफ्रिकेवर ‘यशस्वी’ मालिकाविजय!

Visakhapatnam: Indian players pose with the trophy after winning the third One Day International cricket match against South Africa in Visakhapatnam, Saturday, December 6, 2025. India won the series by 2-1. (Photo: IANS)

टीम इंडिया ने एसीए–वीडीसीए स्टेडियमवर खेळलेल्या निर्णायक तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेला ९ विकेट्सने पराभूत करत मालिका २-१ ने आपल्या नावावर केली. भारतीय संघाचा हा विजय अत्यंत भव्य आणि अभिमानास्पद ठरला.

पहिले फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेची अवस्था सुरुवातीलाच ढासळली. पाचव्या चेंडूवरच रायन रिकेल्टन (०) माघारी परतला. मात्र क्विंटन डी कॉक आणि कर्णधार टेंबा बावुमा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी करत संघाला स्थिरता दिली. बावुमा ४८ धावा करून बाद झाला.

यानंतर डी कॉकने मॅथ्यू ब्रीत्झके सोबत तिसऱ्या विकेटसाठी ५४ धावा जोडून संघाला १६८ पर्यंत नेले. ब्रीत्झकेने २४ धावा, तर देवाल्ड ब्रेविसने २९ धावा केल्या.

भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी ४-४ विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंग आणि रवींद्र जडेजा यांनी १-१ विकेट पटकावली. आफ्रिका संघ ४७.५ षटकांत २७० धावांवर ऑलआऊट झाला.

भारताची दमदार सुरुवात आणि ऐतिहासिक विजय

२७१ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारताला रोहित शर्मा–यशस्वी जायसवाल या सलामी जोडीने स्वप्नवत सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून २५.५ षटकांत १५५ धावांची भागीदारी केली. रोहितने ७५ धावा (७ चौकार, ३ षटकार) केल्या.

यानंतर विराट कोहली मैदानात आला आणि त्याने यशस्वीसोबत विजयाची घोडदौड सुरू ठेवली. दोघांमध्ये ८४ चेंडूत ११६ धावांची अभेद्य भागीदारी झाली.

हेही वाचा:

निलंबित तृणमूल आमदार हमायून कबीरने बाबरी मशीदीची वीट रचली

ठाणे मनपा ऍथलेटिक्स प्रशिक्षण संस्थेच्या खेळाडूंचे दमदार यश

“ईव्हीएम हॅकिंगवर विश्वास नाही!”

मंदिरातील जमा रक्कम देवाचीच; ती सहकारी बँकांना वाचवण्यासाठी नाही

यशस्वी जायसवालचे पहिले वनडे शतक!

यशस्वीने आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक ठोकत
१२१ चेंडूत नाबाद ११६ धावा (१२ चौकार, २ षटकार) नोंदवल्या.
विराट कोहलीनेही ४५ चेंडूत नाबाद ६५ धावा (६ चौकार, ३ षटकार) करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

दक्षिण आफ्रिकेकडून एकमेव विकेट केशव महाराज यांनी घेतली.

भारतीय संघाने ३९.५ षटकांत सामना जिंकत मालिकेत अभिमानास्पद विजय मिळवला.

Exit mobile version