जागतिक फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी याने अनंत अंबानी यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या वनतारा या वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्राला विशेष भेट दिली. या भेटीदरम्यान प्राचीन भारतीय परंपरा आणि आधुनिक, विज्ञानाधारित प्राणी कल्याणाची संकल्पना त्याने समजून घेतली.
वनतारामध्ये कोणतीही उपक्रमाची सुरुवात ही सनातन धर्माच्या तत्त्वांनुसार आशीर्वाद घेऊन केली जाते. सनातन धर्म निसर्गपूजा आणि सर्व सजीवांप्रती आदरभाव यावर भर देतो. मेस्सीच्या या भेटीत हीच मूल्यव्यवस्था स्पष्टपणे दिसून आली. त्याने पारंपरिक हिंदू धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला, वन्यजीवांना जवळून पाहिले तसेच प्राणीसेवक आणि संवर्धन तज्ज्ञांशी संवाद साधला. त्यांच्या या कृतींमधून त्याची नम्रता आणि मानवतावादी मूल्ये अधोरेखित झाली.
इंटर मियामी संघातील सहकारी खेळाडू लुईस सुआरेझ आणि रोड्रिगो डी पॉल यांच्यासह मेस्सींचे वनतारामध्ये भव्य पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. रंगीबेरंगी लोकसंगीत, शुभेच्छा आणि शुद्ध भावनेचे प्रतीक असलेल्या फुलांच्या वर्षावासह तसेच औपचारिक आरतीद्वारे त्यांचे स्वागत झाले.
हे ही वाचा:
‘कॉंग्रेसला भारतीय सशस्त्र दलांचा तिरस्कार’
केरळच्या कम्युनिस्ट किल्ल्याला भगदाड
आवाज कहाँ तक जानी चाहिए? लाहौर तक!
या अर्जेंटिनियन महान खेळाडूने मंदिरात आयोजित महाआरतीमध्येही सहभाग घेतला, ज्यामध्ये अंबे माता पूजा, गणेश पूजा, हनुमान पूजा आणि शिवाभिषेक यांचा समावेश होता. या धार्मिक विधींमधून त्याने जगात शांती आणि एकतेसाठी प्रार्थना केली.
बिग कॅट केअर सेंटरमध्ये लिओनेल मेस्सीला सिंह, बिबट्या आणि वाघांना पाहता आले. नैसर्गिक वातावरणासारख्या समृद्ध अधिवासात वाढणारे हे प्राणी मेस्सीकडे कुतूहलाने पाहत त्यांच्याजवळ आले. त्यानंतर त्यांनी हर्बिव्होर केअर सेंटर आणि रेप्टाइल केअर सेंटरला भेट दिली, जिथे विशेष पशुवैद्यकीय उपचार, सानुकूल पोषण व्यवस्था आणि प्रगत पालन-पोषण पद्धतींमुळे प्राणी उत्तम प्रकारे वाढताना त्यांनी पाहिले. या सर्व अत्याधुनिक सुविधांमुळे वंतारा हे वन्यजीव कल्याणाच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर अग्रगण्य केंद्र ठरले आहे.
यानंतर मेस्सीने बहुविशेषज्ञ वन्यजीव रुग्णालयाला भेट दिली, जिथे सुरू असलेल्या प्रत्यक्ष वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया प्रक्रिया त्यांनी पाहिल्या. त्यानंतर त्यांनी ओकापी, गेंडे, जिराफ आणि हत्ती यांना स्वतः अन्न भरवले. जागतिक दृष्टीकोनातून बोलताना, भारतभर वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल भारताच्या पंतप्रधानांच्या कटिबद्धतेचेही मेस्सींनी कौतुक केले.
अनाथ आणि असुरक्षित पिल्लांसाठी समर्पित असलेल्या फॉस्टर केअर सेंटरमध्ये मेस्सीला संघर्ष, जिद्द यांच्या अनेक प्रेरणादायी कथा ऐकायला मिळाल्या. याचवेळी एका भावनिक क्षणात अनंत अंबानी आणि राधिका अंबानी यांनी एकत्र येऊन एका सिंहाच्या पिल्लाला “लायोनेल” असे नाव दिले. हा उपक्रम फुटबॉलच्या या दिग्गजाच्या सन्मानार्थ आशा आणि सातत्याचे प्रतीक म्हणून करण्यात आला.
या भेटीतील सर्वात भावनिक आणि लक्षवेधी क्षण आला तो हत्तीची काळजी घेतल्या जाणाऱ्या सेंटरमध्ये. येथे मेस्सीने मणिकलाल नावाच्या हत्तीच्या पिल्लाची भेट घेतली. दोन वर्षांपूर्वी लाकूड उद्योगातून मणिकलाल आणि त्याची आजारी आई प्रतिमा यांना वाचवण्यात आले होते. एका अत्यंत हृदयस्पर्शी दृश्यात, मेस्सीने मणिकलालसोबत फुटबॉल खेळण्याचा (एन्रिचमेंट अॅक्टिव्हिटी) अनुभव घेतला, ज्यातून खेळाची सार्वत्रिक भाषा अधोरेखित झाली. हत्तीच्या पिल्लाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, उपस्थित प्रेक्षक आनंदित झाले आणि हा क्षण मेस्सींच्या भारत भेटीतील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक ठरला.
अनंत अंबानी यांनी वनताराला भेट दिल्याबद्दल आणि प्राणी व मानवतेप्रती करुणा जागवण्यासाठी प्रेरणा दिल्याबद्दल आभार मानल्यानंतर, स्पॅनिश भाषेत प्रतिक्रिया देताना लिओनेल मेस्सी म्हणाला, “वनतारा जे कार्य करत आहे ते खरोखरच सुंदर आहे—प्राण्यांसाठी केलेले काम, त्यांना मिळणारी काळजी, त्यांची ज्या पद्धतीने सुटका केली जाते आणि नंतर त्यांची देखभाल केली जाते, हे सर्व अत्यंत प्रशंसनीय आहे. हे खरोखरच प्रभावी आहे. आम्ही येथे खूप छान वेळ घालवला, संपूर्ण भेटीदरम्यान अगदी सहज आणि निवांत वाटले, आणि हा अनुभव कायम लक्षात राहणारा आहे. या अर्थपूर्ण कार्याला प्रेरणा देण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी आम्ही नक्कीच पुन्हा येथे भेट देऊ.”
भेटीचा समारोप होत असताना, मेस्सींनी ‘नारियल उत्सर्ग’ आणि ‘मटका फोड’ या पारंपरिक विधींमध्ये सहभाग घेतला, जे सद्भावना आणि शुभारंभाचे प्रतीक मानले जातात. हा सोहळा शांती आणि कल्याणाच्या मंत्रोच्चारांनी संपन्न झाला, ज्यातून वंताराचे ध्येय आणि मेस्सींची जागतिक वारसा मूल्ये यांच्यातील सामायिक तत्त्वे अधोरेखित झाली.
सामाजिक कार्य, शिक्षण, आरोग्यसेवा आणि बालकल्याणासाठी जगभर कार्य करणाऱ्या ‘लिओ मेस्सी फाउंडेशन’चे नेतृत्व करणाऱ्या या अर्जेंटिनियन दिग्गजाने प्राण्यांसाठी करुणा आणि विज्ञानाधारित काळजी या वंताराच्या दृष्टीकोनाशी आपण पूर्णपणे एकरूप असल्याची भावना व्यक्त केली.
