“पाकिस्तानसारखं राहुल गांधींचंही प्रत्येक राजकीय लाँच अपयशी ठरतं”

भाजप खासदार हेमांग जोशी यांचे राहुल गांधी यांच्यावर टीका 

“पाकिस्तानसारखं राहुल गांधींचंही प्रत्येक राजकीय लाँच अपयशी ठरतं”

निवडणूक आयोगावर आरोप करणाऱ्या राहुल गांधींवर भाजप खासदार हेमांग जोशी यांनी जोरदार निशाणा साधला आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेणे हीच आपल्या लोकशाहीला दु:खद गोष्ट आहे. राहुल गांधी परदेशी  डावांनी प्रभावित होऊन जे स्टंट करतात, ते स्पष्टपणे दिसतं. मला असं वाटतं की बिहारमधील परीक्षेला ते खूप घाबरलेत, इतके की त्यांना परीक्षा द्यायचीच नाहीये, असे खासदार हेमांग जोशी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ”राहुल गांधींबद्दल बोलायचे झाले तर ज्याप्रमाणे पाकिस्तानचे उपग्रह प्रक्षेपण प्रत्येक वेळी अपयशी ठरते, त्याचप्रमाणे राहुल गांधी यांचे राजकीय प्रक्षेपण प्रत्येक वेळी अपयशी ठरते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला ५० हून अधिक निवडणुकांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.
शेतकरी आंदोलनाचा मुद्दा असो, यूपीतील दलित आरक्षणाचा मुद्दा असो, भारत जोडो यात्रा असो, अशी सर्व प्रक्षेपणे त्यांची फेल झाली आहेत. यानुसार, बिहारच्या एसआयआरचा मुद्दा देखील त्यांचा फेल होईल. जर त्यांना देशाच्या लोकशाहीवर विश्वास नसेल, तर त्यांनी लोकसभा सदस्यपदाचा राजीनामा द्यावा.”
तसेच भारतीय निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे, त्यामुळे त्यावरून जास्त प्रश्न उपस्थित करू शकत नाही आणि हे त्यांना चांगलेच माहिती आहे. त्यांचा प्रत्येक दावा दोन सेकंदात ध्वस्त होत आहे. देशाने त्यांना आता चांगलेच ओळखले आहे, असे खासदार जोशी म्हणाले.
हे ही वाचा : 
ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्या स्पेस स्टेशनच्या प्रवासावर चर्चा न होऊ शकणे दुर्दैवी
ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानने लढाऊ नौका लपवल्या, उपग्रह छायाचित्रांनी केले स्पष्ट
राधाकृष्णन यांना दिलेली संधी हे चांगलेच पाऊल
राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत, तोपर्यंत पवित्र संस्थांचा सन्मान राखणं खूप कठीण!

दरम्यान, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना NDA चा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर केल्यानंतर

जोशी म्हणाले, “एनडीएचे उमेदवार अतिशय साध्या पार्श्वभूमीतून आले असून विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे. त्यामुळे मला खात्री आहे की आपले उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार मोठ्या मतांनी विजयी होतील आणि उत्कृष्ट कामगिरी करतील.”

Exit mobile version