मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात भरदिवसा दारू व्यवसायिकाच्या मुनीमकडून ३० लाख रुपयांची लूट करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी नाकेबंदी करत विशेष तपास मोहिम सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बहोडापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दारू व्यापारी विनोद शिवहरे यांचा मुनीम आसाराम कुशवाह बुधवार रोजी ऑफिसमधून ३० लाख रुपये एका बॅगेत ठेवून अॅक्टिवा स्कूटरवरून बँकेत भरण्यासाठी निघाला होता. तो इंदिरा कॉलनीतून जात असताना, कॉलनीच्या कॉर्नरवर पूर्वीपासून दबा धरून बसलेल्या दोन नकाबपोश चोरट्यांनी त्याला ओव्हरटेक केले आणि स्कूटर थांबवून पुढे ठेवलेली पैशांनी भरलेली बॅग हिसकावून पळ काढला.
लूट झाल्यानंतर मुनीमने तात्काळ दारू व्यापाऱ्याला आणि नंतर पोलिसांना याची माहिती दिली. ग्वाल्हेर विभागाचे पोलीस महानिरीक्षक अरविंद सक्सेना यांनी सांगितले की, मुनीम अॅक्टिवावर पायाजवळ बॅग ठेवून निघाला होता, तीच बॅग चोरांनी हिसकावून नेली. पोलिसांनी तातडीने नाकेबंदी करून शोधमोहीम सुरू केली आहे.
हेही वाचा..
माधुरी हत्तीणीच्या परतीसाठी वनताराचा पूर्ण पाठिंबा!
चोरी दरम्यान गोळी लागून चोराचा मृत्यू
ITBP, NDRF ने अडकलेल्या ४१३ तीर्थयात्रेकरूंना वाचवले
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘कर्तव्य भवन’चे उद्घाटन
घटनेचे काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्यात काही आरोपी दुचाकीवरून जाताना दिसत आहेत. मात्र लुटीच्या घटनेत नेमके दोनच आरोपी होते की अधिक, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस सध्या आरोपी ज्या मार्गाने पळून गेले, त्या रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. शहरात ठिकठिकाणी नाकेबंदी करत वाहनांची तपासणी केली जात आहे. पोलिसांचा अंदाज आहे की आरोपींनी मुनीमच्या हालचालींवर आधीच रेकी केली होती आणि त्यानंतरच त्यांनी लूट घडवून आणली. पोलिसांचा दावा आहे की ते लवकरच आरोपींना पकडतील. घटनेनंतर संपूर्ण शहरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
