मुंबईतील कबुतर खान्यावरून सुरू असलेल्या वादावर न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदवले असून कबुतरांना दाणे टाकण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. अर्थात, कबुतर खाने सुरू राहणार नाहीत, हे न्यायालयाने म्हटले आहे.
मुंबई पालिकेने नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन हा कबुतरखाना बंद केला होता. या कबुतरखान्यात कबुतरांना दाणापाणी देणे बंद करण्यात आले होते. या निर्णयानंतर जैन समाजाने आक्रमक पवित्रा धारण केला होता. हे प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयाकडे गेले होते. दरम्यान, आता न्यायालयाने कबुतराखाना बंद ठेवण्याचा आपला आधीचा निर्णय कायम ठेवला आहे.
हे ही वाचा:
भारताने मॉरिशसला १० इलेक्ट्रिक बसेसची पहिली खेप पाठवली
भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन लष्करप्रमुख
शशिकांत चौथाईवाले यांच्या ‘माझी प्रचारक यात्रा’ पुस्तकाचे प्रकाशन
राहुल गांधींचे पुन्हा निवडणूक आयोगावर आरोप; म्हणाले निवडणुका ‘चोरल्या’
न्यायालयाचा निर्णय काय?
मुंबई उच्च न्यायालयाने दादरमधील कबूतरखान्यांवर बंदीचा आधीचा निर्णय कायम ठेवला आहे. सोबतच हा निर्णय देताना आमच्यासाठी नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे. आम्ही दिलेल्या आदेशाचा कोणीही अवमान करू नये, असा इशाराही न्यायालयाने दिलाय. आमच्या निकालावर जर तुमची हरकत असेल तर तुमच्याकडे आदेशाविरोधात दाद मागण्याचे पर्याय उपलब्ध आहेत, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.
नेमका आरोप काय होता?
मुंबईतील कबुतरखाने सध्या बंद करण्यात आले आहेत. पालिकेच्या या कारवाईविरोधात जैन समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. हे कबुतरखाने चालू करावेत या मागणीसाठी ४ ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात आला होता. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार होतात, हे वरवरचे कारण असून मुंबईतल्या जागा आणि चौक हडपण्यासाठी हा कट रचला जातोय, असा आरोप या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आला होता.
