मुस्लिमांच्या दुकानाची एकही काच फुटली नाही, हिंदूंची दुकाने फोडली, हा कसला भाईचारा? 

नागपूर हिंसाचारात बळी पडलेल्या हिंदू दुकानदाराने व्यक्त केली खंत 

मुस्लिमांच्या दुकानाची एकही काच फुटली नाही, हिंदूंची दुकाने फोडली, हा कसला भाईचारा? 

नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांची कारवाई सुरूच आहे. शहरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शहरात हिंसाचार उफाळल्यानंतर मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि दगडफेक झाली. या घटनेत अनेक दुकाने फोडण्यात आली, गाड्या जाळण्यात आल्या. याच दरम्यान, हिंसाचारात बळी पडलेल्या एका हिंदू  दुकानदारचे वक्तव्य समोर आले आहे. दुकानदराने म्हटले की, हिंसाचारा दरम्यान केवळ हिंदूंची दुकाने फोडण्यात आली, तर एकाही मुस्लिमांच्या दुकानाच्या काचाही फुटल्या नाहीत.

हिंदू दुकानदाराने प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाला, याठिकाणी अनेक वर्षांपासून भाईचारापद्धतीने राहत आहोत मग इथली दुकाने का फोडली?, कशाला वाहने जाळली?. याठिकाणी (मुस्लिमांचे) एका लाईनने दुकाने आहेत, मात्र एकाही दुकानाची काच फुटली नाही. केवळ हिंदूवर अत्याचार झाला, आपण किती वेळ हा भाईचारा टिकवून ठेवणार आहोत?, असे दुकानदाराने म्हटले. हे सर्व सांगताना दुकानदाराच्या डोळ्यात पाणी होते.

दरम्यान, हल्लेखोरांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरु आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत पोलिसांनी हिंसाचारात सहभागी असलेल्या एकूण ४६ आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना काल रात्री उशिरा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या आरोपींना २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे ही वाचा  : 

पाकिस्तानमध्ये पतीने पेट्रोल टाकून पत्नीला पेटवले

लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी लालूप्रसाद यादव ईडी कार्यालयात

भारतातील ऑटो घटक निर्यातीत मजबूत वाढ

सुनीता विल्यम्स यांच्या पुनरागमनानंतर झुलासन गावात जल्लोष

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, हिंसाचारात समाजकंटकांनी ३८ दुचाकींचे नुकसान केले. ५ चार चाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. याशिवाय २ जेसीबी आणि १ क्रेनचेही नुकसान झाले आहे. याशिवाय एका सरकारी वाहनाचे नुकसान झाले आहे. पोलिसांकडून अधिक तपास आणि पुढील कारवाई सुरु आहे.

Exit mobile version