पहलगाम हल्ला : बुधवार होणार सीसीएसची बैठक

पहलगाम हल्ला : बुधवार होणार सीसीएसची बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक मंत्रीमंडळ समितीची (CCS) बैठक बुधवार, ३० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. ही बैठक पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आली आहे. यासोबतच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकही बुधवारसाठी प्रस्तावित आहे. सीएसमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, वित्त मंत्री निर्मला सीतारमण आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा समावेश आहे.

यापूर्वी, २३ एप्रिल रोजी, पहलगाम हल्ल्यानंतर झालेल्या सीसीएस बैठकीत भारत सरकारने पाकिस्तानविरोधात अनेक कडक निर्णय घेतले होते. यामध्ये सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेशही देण्यात आले होते. सरकारने स्पष्ट केले होते की, जर या नागरिकांनी दिलेल्या मुदतीत भारत सोडला नाही, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या आदेशानंतर पाकिस्तानातून आलेले नागरिक भारतातून बाहेर जात आहेत.

हेही वाचा..

अनन्या पांडेने इटलीतले फोटो केले शेअर

कौशल्य विकासासाठी भारताचा हे नवे नियोजन

मुख्यमंत्री योगी यांचा का झाला संताप ?

आज ‘महाराष्ट्र दिन’; आर्थिक, सामाजिक क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल

सीसीएसच्या बैठकीत भारत सरकारने पाकिस्तानसोबतचे राजनैतिक संबंध कमी करण्याचा निर्णय घेतला होता. याअंतर्गत नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्या ५५ वरून ३० वर आणण्यात आली. परिणामी, अनेक पाकिस्तानी कर्मचारी देश सोडून गेले आहेत. चबरोबर, भारत सरकारने पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानातील अनेक यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घातली आहे.

२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ या गटाने स्वीकारली आहे. या हल्ल्यात २६ पर्यटकांची निर्दयपणे हत्या करण्यात आली होती. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र केली आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीर सरकारने ४८ पर्यटन स्थळे तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version