पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनेंड आर. मार्कोस ज्युनियर यांच्यात मंगळवारी हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरोधातील भारताच्या लढ्याला समर्थन दिल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष मार्कोस यांचे आभार मानले. पंतप्रधान मोदी म्हणाले, “पहलगाम दहशतवादी हल्ल्याची तीव्र निंदा केल्याबद्दल आणि दहशतवादाविरोधातील आमच्या लढ्यात भारतासोबत उभे राहिल्याबद्दल फिलिपिन्स सरकार आणि राष्ट्राध्यक्षांचे मन:पूर्वक आभार.”
यावेळी भारत आणि फिलिपिन्समधील मैत्रीच्या नात्याबाबतही मोदींनी भाष्य केले. ते म्हणाले, “मी राष्ट्राध्यक्ष मार्कोस आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात मनापासून स्वागत करतो. यावर्षी भारत आणि फिलिपिन्स आपल्या राजनैतिक संबंधांचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहेत आणि त्याच अनुषंगाने ही भेट विशेष महत्त्वाची आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले, “आपले राजनैतिक संबंध भलेही अलीकडचे असले, तरी आपली सांस्कृतिक नाती प्राचीन काळापासूनच दृढ आहेत. फिलिपिन्समधील रामायणावर आधारित ‘महाराडिया लवाना’ हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. नुकतीच जाहीर करण्यात आलेली टपाल तिकिटं, ज्यामध्ये दोन्ही देशांचे राष्ट्रीय फुलं आहेत, ती आपली मैत्री अधोरेखित करतात.”
हेही वाचा..
जेवर इंटरनॅशनल एअरपोर्टचा पाहणी दौरा
पवन कल्याण यांनी देशवासियांना का दिल्या शुभेच्छा
खर्गेंचे कोणते आरोप नड्डा यांनी फेटाळले
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन
पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत आणि फिलिपिन्स यांच्यातील संबंध अनेक वर्षांपासून संवाद आणि सहकार्याच्या भक्कम पायावर आधारलेले आहेत. आज राष्ट्राध्यक्ष मार्कोस आणि मी आपसी सहकार्य, प्रादेशिक मुद्दे आणि जागतिक परिस्थिती यावर सखोल चर्चा केली. मला आनंदाने सांगावं वाटतं की आपण आपल्या संबंधांना ‘रणनीतिक भागीदारी’ चा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एक सविस्तर कृती आराखडाही तयार केला आहे.”
मोदी म्हणाले की, “आपला द्विपक्षीय व्यापार वेगाने वाढत आहे आणि आता तो ३ अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. या व्यापारास आणखी बळ देण्यासाठी भारत-आसियान मुक्त व्यापार कराराची लवकरात लवकर पुनर्रचना करण्यास प्राधान्य दिलं आहे. याशिवाय, आपण एक द्विपक्षीय प्राधान्य व्यापार करार (Preferential Trade Agreement) करण्याच्या दिशेनेही पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे.”
