मुंबईला पावसाने झोडपले, चर्चगेट जलमय, उपनगरात दमदार

उपनगरातही पावसाची हजेरी

मुंबईला पावसाने झोडपले, चर्चगेट जलमय, उपनगरात दमदार

मुंबईत गेल्या २४ तासांत जोरदार पाऊस सुरू असून त्याचा परिणाम जनजीवनावर होऊ लागला आहे. उपनगरातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईतील कुलाबा परिसरात सर्वाधिक पाऊस पडला असून त्या खालोखाल सीएसएमटी, नरिमन पॉईंट परिसरात देखील जास्त पाऊस पडला आहे. त्यामुळे चर्चगेट परिसर जलमय झाला होता.

मुंबईत बुधवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यातच हवामान विभागाकडून बुधवारी संध्याकाळी मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवार, २७ जुलै रोजी मुंबईतील शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासांत महानगरपालिकेच्या पर्जन्य मापक यंत्रावरील नोंदणीनुसार दक्षिण मुंबईत सर्वाधिक पाऊस पडला.

गुरुवारी सकाळपासूनच मुंबईच्या अंधेरी, गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली या परिसरात पावसाचा जोर वाढला असून सखल भागात पाणी साचत आहे. अंधेरी सबवेमध्ये पाणी साचले असून वाहतूक कोंडी देखील होत आहे. मुंबईत जनजीवन विस्कळीत झाले आहे. दादर, माहिम, सायन, कुर्ला, वरळी, वांद्रे परिसरातही पावसाच्या सरी सुरू असून मुंबईतील अनेक उंच इमारतींवर ढग जमले आहेत.

हे ही वाचा:

मिठी साफ करता आली नाही, ते मोदींना प्रश्न विचारतायत…

अडीच वर्षांत अडीच दिवसही मंत्रालयात गेले नाहीत ते मोदींना नऊ वर्षांत काय केलं विचारतायत

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला; ३० घरे पेटवली

वक्फ बोर्डानंतर जमियतही म्हणते अहमदीया हे मुस्लिम नाहीत!

राज्यातही इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित झाली आहे. त्याचबरोबर वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता असल्याने पुढील पाच दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Exit mobile version