धुरंधर २ द रिव्हेन्ज या चित्रपटाने अवघ्या जगावर गारुड केलं आहे. जिकडेतिकडे याच चित्रपटाची चर्चा आहे. चित्रपटाला विरोध करणारेही पूर्ण चित्रपट पाहून त्याचा विरोध करत आहेत. त्याच्या कमाईच्या आकड्यांची चर्चा होते आहे, त्याने केलेल्या विक्रमांची चर्चा होते आहे. पण त्यापलिकडे जाऊन हा चित्रपट काय आहे, हे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी सांगितले आहे. राम गोपाल वर्मा हे या चित्रपटाच्या आधीपासूनच प्रेमात पडले आहेत. पण त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.
एक्सवर पोस्टद्वारे त्यांनी या चित्रपटाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते लिहितात की, धुरंधर २ हा फक्त बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडत नाहीये, तर तो प्रत्यक्षात भारतीय सिनेमाचा पाया हादरवणारा “न्यूक्लिअर बॉम्ब” ठरत आहे. आणि केवळ त्याच्या जबरदस्त कमाईकडे पाहून आपण खऱ्या अर्थाने झालेल्या या मोठ्या बदलाकडे दुर्लक्ष केलं, तर ती एक मोठी चूक ठरेल.
दिग्दर्शक आदित्य धर यांनी भारतीय सिनेमाची व्याख्या ‘भारतीय सिनेमा असा आहे’ वरून ‘भारतीय सिनेमा असा होता’, अशी बदलली आहे. कथेमधील ट्विस्ट जितके धक्कादायक आहेत, त्याहूनही अधिक धक्कादायक म्हणजे सिनेमाच्या रचनेत केलेले बदल, जे आतापर्यंतच्या पारंपरिक पद्धतींपेक्षा पूर्ण वेगळे आहेत.
हे ही वाचा:
दोन भारतीय एलपीजी जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडण्याची परवानगी
वित्त विधेयकासह, कॉर्पोरेट कायदा (दुरुस्ती) विधेयक लोकसभेत सादर
‘इराणने इस्रायलच्या नागरिकांच्या सामुहिक हत्येचा प्रयत्न केला’
पाकिस्तान सुपर लीगला युद्धाचा फटका; स्पर्धा फक्त दोन शहरांपुरती मर्यादित
द गॉडफादर सारख्या चित्रपटांपासून प्रेरित ‘शिवा’, ‘सत्या’, ‘कंपनी’ आणि ‘सरकार’ या माझ्या चित्रपटांनी गुन्हेगारी जगातील वास्तव आणि सत्तेच्या खेळांचे वास्तवदर्शी चित्रण केले. पण आदित्य धर यांनी या सगळ्या कामांचा अभ्यास शास्त्रज्ञासारखा केला, त्यातील सार काढले, त्याला अनेक पटींनी वाढवले आणि त्यात देशभक्तीचा अंश ठासून भरला.
त्यात त्यांनी तीव्र भू-राजकारण, दहशतवाद, गुप्तहेरगिरी आणि इंटेलिजन्स वॉरफेअर यांचा समावेश करून विश्वासघात आणि निष्ठा यांचे गुंतागुंतीचे मिश्रण तयार केले. या सर्वांचा परिणाम असा झाला आहे की फिल्म इंडस्ट्रीचा पाया हलू लागला आहे. माझे चित्रपट आता शाळकरी मुलांच्या निबंधांसारखे वाटतात, तर आदित्य धर यांचे काम भविष्यातील सिनेमावर आधारित एक शास्त्रीय प्रबंध वाटतो.
१९ मार्च २०२६ पूर्वी लिहिलेल्या स्क्रिप्टवर अजूनही काम करत राहणारा कोणताही दिग्दर्शक अगदी माझ्यासारखाही, जर स्वतःला हे विचारत नसेल की, ती कथा धुरंधर २ ने सेट केलेल्या नव्या मापदंडाच्या जवळ जाणारी तरी आहे का?” — तर तो मूर्ख ठरेल. धुरंधर २ हा फक्त गेम चेंजर नाही, तर त्याने सिनेमाच्या सर्व जुन्या रुढींना भस्मसात केले आहे.
माझा सल्ला आहे की, प्रत्येक दिग्दर्शकाने (विशेषतः मी स्वतः) १९ मार्च २०२६ पूर्वी लिहिलेल्या सर्व स्क्रिप्ट्स आता विसरून जाव्यात आणि नव्याने सुरुवात करावी.
रामगोपाल वर्मा यांनी एक वाक्य त्यात उद्धृत केले आहे. “कला म्हणजे ती आत्ता काय आहे हे नाही, तर ती काय होऊ शकते आणि काय असायला हवी याबद्दल आहे.”
— Ayn Rand
भारतीय सिनेमाच्या भविष्यासाठी, आदित्य धर यांना धन्यवाद — त्यांनी आपल्याला सिनेमा काय असू शकतो आणि काय असायला हवा हे दाखवून दिले.
