बिहार विधानसभा निवडणुकीत राजद फक्त २० जागांवरच थांबेल

शहनवाज हुसैन यांचा दावा

बिहार विधानसभा निवडणुकीत राजद फक्त २० जागांवरच थांबेल

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाज हुसैन यांनी गुरुवारी राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि ‘इंडी अलायन्स’वर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी दावा केला की आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत राजद केवळ २० जागांपुरतेच मर्यादित राहील. त्यांनी महागठबंधनला ‘महादरार’ असं नाव दिलं. हुसैन म्हणाले की महागठबंधनामध्ये काहीही सुरळीत नाही. मुकेश सहनी, जे स्वतःलाच उपमुख्यमंत्री घोषित करत आहेत, त्यांनाही हे माहीत आहे की तेजस्वी यादव मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत. त्यांची सत्ता येणार नाही.

हुसैन पुढे म्हणाले की ‘इंडी अलायन्स’ची अवस्था कमकुवत आहे, आणि त्यांनी त्याला “बुडती नाव” असे संबोधले. त्यांच्या मते, या आघाडीतील घटक पक्ष लवकरच वेगळे होतील, कारण राजदमध्ये अंतर्गत मतभेद आणि कमजोरी स्पष्टपणे दिसून येत आहे. ते म्हणाले की कालांतराने कोण कुठल्या पक्षात जाणार आहे हे स्पष्ट होईल, पण सध्या तरी राजदची अवस्था “महादरार” आहे. अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रवक्त्यांनी सांगितले की भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे. कितीही अडचणी आल्या तरी भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल आणि ते कोणीही रोखू शकत नाही.

हेही वाचा..

अटल ब्रिजबद्दल उमर अब्दुल्ला काय म्हणाले ?

सीलिएकसाठीची औषधं कोविडनंतरच्या सिंड्रोमवर परिणामकारक

‘बलुचिस्तान विक्रीसाठी नाही’

‘ऑपरेशन सिंदूर’ सुरूच राहील

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर दिलेल्या वक्तव्याचे त्यांनी समर्थन केले. त्यांनी म्हटलं की, काँग्रेसने १९७१ मध्ये, जेव्हा पाकिस्तान पूर्णपणे पराभूत झाला होता, तेव्हा पीओके (पाकव्याप्त काश्मीर) परत घेण्याची संधी दवडली. त्यांनी विचारलं, “जेव्हा भारताकडे ९३,००० पाकिस्तानी सैनिक होते, तेव्हा काँग्रेसने पीओके का नाही घेतलं? मालेगाव स्फोट प्रकरणाबाबत त्यांनी म्हटलं, “काँग्रेसने ‘भगवा दहशतवाद’ आणि ‘हिंदू दहशतवाद’ हे शब्द एका पूर्वनियोजित कटाअंतर्गत तयार केले. यामार्फत त्यांनी देशभरातील हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न केला.

Exit mobile version