चांद्रयान ३ ने मातीचे पहिले परीक्षण नोंदविले

इस्रोने ट्विट करत जाहीर केला आलेख

चांद्रयान ३ ने मातीचे पहिले परीक्षण नोंदविले

चांद्रयान ३ चंद्रावर उतरल्यानंतर तिथे प्रज्ञान रोव्हरने आपल्या कामाला प्रारंभ केला आहे. दक्षिण ध्रुवावरील मातीचे परीक्षण त्याने सुरू केले आहे. त्यात मातीच्या १० सेंटीमीटर खाली तापमानात फरक असल्याचे लक्षात आले आहे. २३ ऑगस्टला चांद्रयान चंद्रावर पोहोचल्यानंतर चार दिवसांनी रोव्हरने मातीच्या बाबतीत ही नवी माहिती समोर आणली आहे. प्रथमच दक्षिण ध्रुवावरील मातीचे परीक्षण या निमित्ताने केले जात आहे.

 

 

आतापर्यंत कोणत्याही देशाने दक्षिण ध्रुवावर आपली चांद्र मोहिम पोहोचवलेली नाही. पण भारताने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इस्रोने चंद्रावरील मातीच्या तापमानातील फरकाचा आलेख मांडला आहे. यात चंद्राच्या पृष्ठभागावरील विविध तापमानांची माहिती हे रोव्हर देणार आहे. चंद्राच्या चारही दिशांना असलेल्या मातीच्या तापमानाचा अंदाज हे रोव्हर मांडेल. त्यात मातीच्या १० सेमीपर्यंतचे तापमान तपासले जाईल. त्यात तापमानाचे १० वेगवेगळे सेन्सर लावण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

गॅलेक्सी हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत तीन दगावले

भारतातील चैतन्य, विविधता पाहून जी-२० परिषद प्रभावित!

धारावीत अजगर घुसला; घरातल्या पाळीव सशालाच गिळले

एकट्या पोलिसाने कोयता घेऊन हप्ते वसुली करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या

 

इस्रोने ट्विट केले आहे की, या आलेखात चंद्रावरील पृष्ठभागाच्या तापमानातील अंतर दर्शवले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील हा पहिलाच असा अंदाज आहे. अद्याप यासंदर्भातील विस्तृत अवलोकन करण्यात येणार आहे. चांद्रयान ३ वर सात पेलोड आहेत. चार विक्रम लँडरवर आहेत तर दोन प्रज्ञान रोव्हरवर आणि प्रोपल्शन मॉड्युलवर एक पेलोड आहे. विविध वैज्ञानिक प्रयोगांसाठी हे पेलोड आहेत.

 

 

इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी म्हटले आहे की, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची निवड करण्यामागे आमचा हा हेतू आहे की, तिथे भविष्यात माणसाला काही उपयुक्त गोष्टी सापडू शकतील. चंद्राच्या या भागावर सूर्याचा कमी प्रकाश आहे. यामुळे तिथली माती कशापद्धतीची आहे, याचे ज्ञान होईल.

Exit mobile version