प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीत तंदूरवर बंदी

दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने दिले निर्देश

प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीत तंदूरवर बंदी

राष्ट्रीय राजधानी दिल्ली सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून हवेची पातळी देखील खालावली आहे. अशातच भाकरी आणि भाजलेले पदार्थ बनवण्यासाठी वापरला जाणारा तंदूर, दिल्लीच्या प्रदूषणासाठी घातक असल्याचे समोर आले आहे. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने (DPCC) शहरातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खुल्या भोजनालयांमध्ये कोळसा आणि लाकडाचा वापर करणाऱ्या तंदूरवर बंदी घालण्याचे निर्देश जारी केले आहेत.

मंगळवारी सकाळी १० वाजता दिल्लीतील आनंद विहार आणि आयटीओ येथे दिल्लीतील हवेचा दर्जा निर्देशांक (AQI) सुमारे ४०० नोंदवला गेला. रेस्टॉरंट्स आणि भोजनालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंदूरवर गेल्या आठवड्यात बंदी घालण्यात आली. ९ डिसेंबर रोजी पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, हवा (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा, १९८१ च्या कलम ३१(अ) अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे. सर्व रेस्टॉरंट्स आणि भोजनालयांना ताबडतोब इलेक्ट्रिक, गॅस-आधारित किंवा इतर इंधन उपकरणांकडे वळावे लागेल.

हे ही वाचा:

‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात ईडीच्या आरोपपत्राची दखल घेण्यास न्यायालयाचा नकार

१९९६ चा विश्वचषक जिंकून देणाऱ्या श्रीलंकन कर्णधाराला होणार अटक!

कांदिवलीत मोबाईल चोरीच्या आरोपीचा पोलिसांवर हल्ला

जागतिक AI रँकिंगमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर; एका वर्षात चार स्थानांनी घेतली झेप

दिल्ली-एनसीआरमध्ये हवेची गुणवत्ता खालावल्याने, गेल्या आठवड्यात शनिवारी श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेचा (GRAP) चौथा टप्पा लागू करण्यात आला. प्रदूषण पातळीने गंभीर मर्यादा ओलांडल्यानंतर, त्यांच्या GRAP उपसमितीने स्टेज-IV किंवा “गंभीर+” हवेच्या गुणवत्तेअंतर्गत सर्व उपाययोजना तात्काळ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट (CAQM) ने म्हटले आहे.

Exit mobile version