रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २ द रिव्हेन्ज’ने प्रीमियर शोमधून कमावले ५२ कोटी

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २ द रिव्हेन्ज’ने प्रीमियर शोमधून कमावले ५२ कोटी

अभिनेता रणवीर सिंग याच्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केली असून, पेड प्रीमियर शोमधूनच कमाईचा मोठा विक्रम केला आहे. या चित्रपटाने भारतात ₹५२ कोटींपेक्षा अधिक कमाई करत पहिल्या भागाचा विक्रम मोडला आहे.

पेड प्रीमियरमधून विक्रमी कमाई

दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीचे देशभरात १२ हजारांपेक्षा अधिक शो ठेवण्यात आले होते. ट्रॅकिंग वेबसाइट सॅकनिल्कनुसार देशांतर्गत नेट कलेक्शन (कर वजा करून): ₹४४ कोटी असून एकूण ग्रॉस कलेक्शन  ₹५२ कोटी आहे. एकूण शो: १२,२९२  झालेले आहेत. यामुळे ‘धुरंधर: द रिव्हेंज’ने भारतीय चित्रपटांच्या पेड प्रीमियरमधील सर्व विक्रम मोडले आहेत.

 पहिल्या भागापेक्षा मोठी सुरुवात

या चित्रपटाने ‘धुरंधर’च्या पहिल्या भागाच्या ओपनिंग डेसाठी ३३ कोटींचा आकडा पार केला. जरी पेड प्रीव्ह्यू शोसाठी तिकिटांचे दर जास्त होते, तरीही प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळाली.

हे ही वाचा:

अमेरिकन फेडच्या निर्णयानंतर सोन्या-चांदीत घसरण

शशी थरूर म्हणतात, इराण युद्धात भारताची भूमिका जबाबदारपणाची

साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचे महत्त्व काय?

मेट्रो बोगद्याजवळ बोअरवेल खणली, गुन्हा दाखल

झाला उशीर आणि शो रद्द

१८ मार्च रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता अनेक शो नियोजित होते पण कंटेंट उशिरा पोहोचल्यामुळे काही शो रद्द करण्यात आले. थिएटर चेनकडून प्रेक्षकांना रिफंडही देण्यात आला.  तरीही प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. उशीर आणि काही शो रद्द होऊनही प्रेक्षक मोठ्या संख्येने थिएटरमध्ये दाखल झाले.

प्राथमिक अहवालानुसार हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील सर्व विक्रम मोडण्याची शक्यता आहे. आणि ऐतिहासिक कमाई करण्याच्या मार्गावर आहे

आजपासून जगभर प्रदर्शन

‘धुरंधर: द रिव्हेंज’ आजपासून जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रणवीर सिंग हा प्रमुख भूमिकेत असून आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन, राकेश बेदी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 पहिल्या भागाची कमाई

‘धुरंधर’चा पहिला भाग डिसेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जगभरात सुमारे ₹१३०० कोटींची कमाई केली होती.

Exit mobile version