ज्येष्ठ विचारवंत आणि माजी आमदार डॉ. अशोक गजानन मोडक यांचे शुक्रवार, २ जानेवारी रोजी निधन झाले. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी बुधवार, २१ जानेवारी २०२६ रोजी ‘श्रद्धांजली सभे’चे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. अशोकराव मोडक यांच्या ‘श्रद्धांजली सभे’चे आयोजन दादरमधील प्रा. बी. एन. वैद्य सभागृह येथे करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या श्रद्धांजली सभेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे उपस्थित असणार आहेत.
ठिकाण: प्रा. बी. एन. वैद्य सभागृह, राजा शिवाजी विद्यालय संकुल, हिन्दू कॉलोनी, दादर पूर्व.
वेळ: सायं. ठीक ०६:३० वा.
गेल्या एक वर्षापासून डॉ. अशोक मोडक हे कर्करोगाशी झुंज देत होते. माजी आमदार आणि मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष. डॉ. अशोक मोडक यांचा जन्म १९४० मध्ये झाला. डॉ. मोडक यांनी दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम. ए. आणि राज्यशास्त्रात एम. ए. आणि जेएनयूमधून पीएच. डी. केली. त्यांनी १९६३ ते १९९४ पर्यंत प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी १०४ प्रबंध आणि ४० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध विद्यापीठांमध्ये व्याख्याने दिली आहेत.
