बडगाममधून दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक!

सुरक्षा दलांनी दारूगोळा केला जप्त

बडगाममधून दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक!

जम्मू आणि काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यासह अटक करण्यात आली आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांवर सतत कारवाई केली जात आहे. याच कारवाई दरम्यान, श्रीनगरच्या बाहेरील बुचपोरा शहरात नाका तपासणी मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. सुरक्षा दलांनी त्याच्याकडून एक पिस्तूल, एक ग्रेनेड आणि १५ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

खरंतर, रविवारी (४ मे) रात्री सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त करून तेथून एक इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (आयईडी) आणि दोन वायरलेस सेट जप्त करण्यात आले. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली.

राष्ट्रीय रायफल्स (आरआर), भारतीय लष्कराच्या पॅरा कमांडो युनिट्स आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या संयुक्तपणे केलेल्या शोध मोहिमेदरम्यान पाकिस्तानी दहशतवाद्यांचा एक अत्याधुनिक ‘फॉक्स होल’ सापडला. या ‘फॉक्स होल’ची रचना आणि त्यात लपलेल्या संसाधनांनी सुरक्षा संस्थांनाही धक्का दिला होता. सुमारे सहा फूट खोल आणि आठ फूट रुंद असलेल्या या भूमिगत खड्ड्यात दहशतवाद्यांनी दीर्घकाळ लपण्याची व्यवस्था केली होती. येथे दहशतवाद्यांनी गॅस सिलेंडर, सौर दिवे, शस्त्रे आणि इतर आवश्यक वस्तू लपवून ठेवल्या होत्या.

हे ही वाचा : 

अखिलेश यादव पुन्हा बरळले

पाकिस्तानचा रक्तदाब वाढला, भारत कधीही हल्ला करेल म्हणत दिला इशारा!

भारत बनेल जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था

भारताची कोंडी करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत गेलेल्या पाकसाठी ‘कठीण प्रश्नावली’

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी संपूर्ण खोऱ्यात मोठ्या प्रमाणात दहशतवादविरोधी मोहिमा सुरू केल्या आहेत, संशयित लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत, शोध मोधीमेदरम्यान दहशतवाद्यांनी वापरलेले आश्रयस्थान उद्ध्वस्त केले आहेत आणि शेकडो दहशतवाद्यांशी संबंधितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सुरक्षा दलांकडून अजूनही शोध मोहीमसुरु आहे.

Exit mobile version