WPL २०२६ साठी मुंबई इंडियन्स सज्ज!

WPL २०२६ साठी मुंबई इंडियन्स सज्ज!

महिला प्रीमियर लीग २०२६ हंगामाला ९ जानेवारीपासून सुरुवात होत असून, उद्घाटन सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स महिला संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जाणार आहे. मागील तीन हंगामांपैकी दोन वेळा विजेतेपद पटकावलेल्या, हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने आगामी हंगामासाठी तयारीला सुरुवात केली आहे.

मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षण शिबिर सुरू झाला असून, मुख्य प्रशिक्षक लिसा कीटली, गोलंदाजी प्रशिक्षक व टीम मेंटर झूलन गोस्वामी आणि फलंदाजी प्रशिक्षक देविका पल्शिकार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सत्रे सुरू आहेत. या प्री-सीझन प्रशिक्षणात सायका इशाक, सजना एस, संस्कृती गुप्ता, पूनम खेमनार, त्रिवेणी वशिष्ठ, एन. क्रांती रेड्डी आणि राहिला फिरदौस यांनी सहभाग घेतला आहे. सराव सत्रांमध्ये फिटनेस आणि खेळाडूंच्या क्षमतेच्या मूल्यमापनावर विशेष भर देण्यात आला आहे.

मुख्य प्रशिक्षक लिसा कीटली म्हणाल्या,
“हे खूपच उत्साहवर्धक आहे. आम्ही पहिलं प्रशिक्षण सत्र पूर्ण केलं आहे. घरगुती खेळाडूंंसोबत काम करताना खूप आनंद मिळतो. त्या काय करू शकतात, हे पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. हंगामापूर्वीचा ट्रेनिंग कॅम्प हा खेळाडूंशी संवाद साधण्यासाठी, त्यांना समजून घेण्यासाठी आणि संघातील समन्वय वाढवण्यासाठी उत्तम संधी असते. आतापर्यंत जे काही पाहिलं आहे, त्यावरून मी खूप प्रभावित आहे.”

महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारीदरम्यान खेळवली जाणार आहे. पाच संघांमध्ये एकूण २२ सामने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम आणि वडोदऱ्यातील कोटांबी स्टेडियम येथे होतील. २०२३, २०२४ आणि २०२५ या तीन हंगामांपैकी मुंबई इंडियन्सने पहिला आणि तिसरा हंगाम जिंकला आहे, तर २०२४ मध्ये आरसीबीने विजेतेपद पटकावले होते. दिल्ली कॅपिटल्सने सलग तीन वेळा अंतिम फेरी गाठली असली, तरी अजूनही त्यांना जेतेपद मिळालेले नाही.

महिला प्रीमियर लीग २०२६ साठी मुंबई इंडियन्स संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), नेट सायव्हर-ब्रंट, हेली मॅथ्यूज, अमनजोत कौर, कमलिनी जी, अमेलिया केर, शबनम इस्माइल, राहिला फिरदौस, सजना एस, संस्कृती गुप्ता, निकोला कॅरी, पूनम खेमनार, त्रिवेणी वशिष्ठ, नल्ला रेड्डी, मिली इलिंगवर्थ, सायका इशाक

Exit mobile version