आयबीएमने शुक्रवारी भारतातील कौशल्य विकासासाठी एका मोठ्या मोहिमेची घोषणा केली आहे. या अंतर्गत २०३० पर्यंत ५० लाख भारतीय विद्यार्थी आणि युवकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), सायबर सुरक्षा आणि क्वांटम कंप्युटिंगसारख्या प्रगत तंत्रज्ञानांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे आयबीएम स्किल्सबिल्डच्या माध्यमातून राबवली जाणार असून, देशात भविष्यासाठी सज्ज मनुष्यबळ तयार करणे आणि विद्यार्थी तसेच प्रौढांना डिजिटल व रोजगाराभिमुख कौशल्यांपर्यंत सुलभ प्रवेश देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
आयबीएमने सांगितले की, या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रगत तंत्रज्ञानाचे शिक्षण अधिक समावेशक आणि सुलभ केले जाईल. याअंतर्गत शाळा, विद्यापीठे आणि व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांमध्ये एआय आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान शिक्षणाचा विस्तार करण्यात येणार आहे. आयबीएम ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) यांसारख्या संस्थांसोबत भागीदारी करून एआय-केंद्रित अभ्यासक्रम, शिक्षक प्रशिक्षण, हॅकथॉन आणि इंटर्नशिपसारख्या उपक्रमांना चालना देणार आहे. यामागील उद्देश विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रत्यक्ष अनुभव देणे हा आहे.
हेही वाचा..
करसंकलन ८ टक्क्यांनी वाढून १७ लाख कोटीच्या पुढे
बांगलादेशात टागोरांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्थापन झालेले ‘छायानौत’ भस्मसात
लोकसभेचे अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब, सभेची उत्पादकता १११ टक्के
‘सर तन से जुदा’ ही घोषणा भारताच्या एकता, अखंडतेला आव्हान देणारी
आयबीएमचे चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कृष्णा यांनी सांगितले की, भारतामध्ये एआय आणि क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्याची क्षमता आहे. या योजनेमुळे युवकांना नवीन गोष्टी शिकण्याची, नवोन्मेष करण्याची आणि देशाच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. आयबीएम शाळांमध्ये एआय शिक्षण अधिक मजबूत करत आहे. वरिष्ठ माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी एआय अभ्यासक्रम विकसित करण्यात येत असून, शिक्षकांना एआय प्रोजेक्ट कुकबुक, शिक्षक मार्गदर्शिका आणि स्पष्टीकरणात्मक मॉड्यूल्ससारखी सामग्री उपलब्ध करून दिली जात आहे. याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संगणकीय विचारसरणी आणि जबाबदार एआयची समज निर्माण करणे हा आहे. या योजनेचा मुख्य भाग असलेले आयबीएम स्किल्सबिल्ड हे जगातील सर्वात मोठ्या आणि सुलभ डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. या प्लॅटफॉर्मवर एआय, सायबर सुरक्षा, क्वांटम कंप्युटिंग, क्लाउड, डेटा तसेच रोजगाराशी संबंधित कौशल्यांवरील १,००० हून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
