केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवार, १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प मांडला. निर्मला सीतारमण यांनी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प मांडताना निर्मला सीतारमण यांनी म्हटले की, ‘आत्मनिर्भर भारत’ हे सरकारचे सर्वात प्रमुख लक्ष्य आहे. देशातंगर्त उत्पादन वाढवण्यावर भर असल्याचे महत्त्वाचे विधान त्यांनी यावेळी केले. तसेच देशाला बायोफार्मास्युटिकल हबमध्ये रूपांतरित केले जाईल, अशी घोषणा करत त्यांनी यासाठी तरतुदीची घोषणा केली आहे.
बायोफार्मास्युटिकल क्षेत्रासाठी मोठी घोषणा करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, “भारताला जागतिक बायोफार्मास्यूटिकल उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी, मी ‘बायोफार्म शक्ती’ योजना प्रस्तावित करत आहेत. यामुळे पुढील पाच वर्षांत १०,००० कोटींची तरतूद केली जाईल. यामुळे बायोलॉजिक्स आणि बायोसिमिलरच्या देशांतर्गत उत्पादनासाठी एक मजबूत परिसंस्था तयार होईल.”
हे ही वाचा:
निर्मला सीतारमण यांची कांजीवरम साडी! काय आहे संदेश?
भारत इराण ऐवजी व्हेनेझुएलाकडून कच्चे तेल आयात करेल!
“आसिम मुनीर आणि मी जगभर पैसे मागण्यासाठी जातो, तेव्हा लाज वाटते”
सुनेत्रा अजित पवार महाराष्ट्राच्या नव्या उपमुख्यमंत्री
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशातील बायोफार्मास्युटिकल्ससाठी १०,००० कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली. ही तरतूद पाच वर्षांत करण्याचे नियोजन आहे. त्यांनी सांगितले की, देशाला बायोफार्मास्युटिकल हबमध्ये रूपांतरित केले जाईल. अर्थमंत्र्यांनी पुढे सांगितले की यामुळे गंभीर आजारांवरील औषधे परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध होतील. संशोधन, नवोपक्रम, लस विकास आणि प्रगत उपचारपद्धती या क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्या म्हणाल्या. औषधनिर्माण शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी तीन नवीन राष्ट्रीय NIPERs (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च) स्थापन केले जातील. यामुळे दर्जेदार कौशल्ये, अत्याधुनिक प्रयोगशाळा सुविधा आणि जागतिक प्रतिभा विकसित होण्यास मदत होईल. सध्या सात संस्था आहेत, ज्यांचा आणखी विस्तार केला जाईल, असं अर्थमंत्री म्हणाल्या.
