आर्थिक वर्ष २०२७ मध्ये उत्पन्नवाढ सुधारण्याची अपेक्षा आणि अमेरिकेसोबत व्यापार करार होण्याच्या शक्यतेमुळे येत्या नववर्षात म्हणजेच २०२६ मध्ये परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) पुन्हा भारतात परत येऊ शकतात. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या एचएसबीसी म्युच्युअल फंडच्या अहवालानुसार, “२०२६ बाबत भारतीय शेअर बाजारासाठी सकारात्मक दृष्टिकोन आहे. निफ्टीचा प्राइस-अर्निंग्स (पीई) रेशो २०.५ पट आहे, जो मागील ५ वर्षांच्या सरासरीइतकाच असून १० वर्षांच्या सरासरीपेक्षा थोडा अधिक आहे. याचा अर्थ देशांतर्गत बाजारात गुंतवणुकीसाठी चांगली संधी आहे.”
अहवालात नमूद करण्यात आले आहे की बँकिंग आणि नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपन्या (एनबीएफसी) यांच्यावर गुंतवणूकदारांचा अधिक भर असल्याने आर्थिक वर्ष २०२७ मध्ये बँकांचा नफा वाढू शकतो. आर्थिक वर्ष २०२६ मधील मंदीनंतर आर्थिक वर्ष २०२७ मध्ये खासगी बँकांच्या मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा होईल, ज्यामुळे त्यांच्या कमाईत मध्यम स्वरूपाची वाढ होऊ शकते. याशिवाय, कर्जाची मागणी वाढणे आणि व्याजदर कमी होण्याचा फायदा एनबीएफसींना होत असून त्यामुळे त्यांचा नफाही वाढत आहे.
हेही वाचा..
ख्रिसमसपूर्वी भारतीय शेअर बाजार किंचित घसरणीसह बंद
अणुऊर्जा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत जपान
मुस्लिम मतांसाठीच ममता बॅनर्जी बांगलादेशींना पाठिंबा देतात
एचएसबीसीने ग्राहक वस्तू क्षेत्रालाही तेजीचा कल असलेले म्हटले आहे — विशेषतः इंटरनेट प्लॅटफॉर्म्स, ई-कॉमर्स आणि क्विक कॉमर्ससारख्या क्षेत्रांना फायदा होत आहे. ग्राहकांचा कल वेगाने ऑनलाइन खरेदीकडे वळत आहे. दागिने, वाहन उद्योग आणि प्रवासाशी संबंधित क्षेत्रांनाही सरकारी योजनांचा लाभ मिळत असून त्यामुळे ग्राहकांची खर्च करण्याची क्षमता वाढत आहे. अहवालात असेही म्हटले आहे की २०२६ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग हे मोठे संधीचे क्षेत्र ठरू शकते, कारण सरकारने त्यासाठी अनेक प्रोत्साहनात्मक पावले उचलली आहेत. यामुळे भारतातील इलेक्ट्रॉनिक्स पुरवठा साखळी अधिक मजबूत होईल.
मात्र, आयटी आणि औद्योगिक क्षेत्राबाबत अहवालात नकारात्मक दृष्टिकोन व्यक्त करण्यात आला आहे. आयटी क्षेत्राची कमाई आर्थिक वर्ष २०२७ मध्ये थोडी वाढू शकते; पण ती वाढ प्रामुख्याने जनरिक एआयच्या वाढत्या मागणीमुळेच शक्य आहे. मेटल क्षेत्राबाबत विशेषतः अॅल्युमिनियम आणि स्टील अहवालात नमूद करण्यात आले आहे की त्यांच्या किंमती आधीच उच्च पातळीवर आहेत आणि त्यात फारशी वाढ होण्याची शक्यता कमी आहे. २०२५ मध्ये भारतीय बाजारांची कामगिरी संमिश्र राहिली. नोव्हेंबरपर्यंत निफ्टी टीआरआयमध्ये १२ टक्के वाढ झाली, तर एनएसई मिडकॅपमध्ये ६.५ टक्के वाढ आणि बीएसई स्मॉलकॅपमध्ये ५ टक्के घट नोंदवली गेली. अहवालात म्हटले आहे, “२०२५ मध्ये निफ्टीमध्ये उत्पन्नवाढ कमी राहिली आणि शेअर बाजारात सुस्ती दिसली, तरी आर्थिक पातळीवर अनेक सकारात्मक संकेत आहेत, जे २०२६ मध्ये बाजाराला आधार देऊ शकतात.”
