सोनं आणि चांदीचे दर आज पुन्हा उच्चांकावर

गुंतवणूक वाढल्याने दरांमध्ये तेजी

सोनं आणि चांदीचे दर आज पुन्हा उच्चांकावर

आज देशांतर्गत सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील संकेत आणि जागतिक आर्थिक घडामोडींचा थेट परिणाम आजच्या दरांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम सुमारे 1 लाख 55 हजार ते 1 लाख 58 हजार रुपयांच्या दरम्यान व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात आज सुमारे 2,500 ते 3,000 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

त्याचबरोबर चांदीच्या दरातही आज मोठी तेजी पाहायला मिळाली. आज चांदीचा दर प्रति किलो सुमारे 3 लाख 30 हजार ते 3 लाख 32 हजार रुपयांपर्यंत पोहोचला असून, चांदीच्या दरात आज प्रति किलो 12 ते 15 हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे सराफा बाजारात चांदीने नवा उच्चांक गाठल्याचे चित्र आहे.
हे ही वाचा:
छगन भुजबळ महाराष्ट्र सदन घोटाळ्यात निर्दोष

टी-२० वर्ल्ड कपमधून बाहेर; सरकारच्या निर्णयाने बांगलादेशी खेळाडू नाराज

सायना नेहवालच्या शानदार कारकिर्दीला सलाम

इंदूरमध्ये दूषित पाणी पिल्याने २२ जण आजारी

जागतिक बाजारात डॉलरमधील चढउतार, अमेरिकेतील व्याजदर धोरण, तसेच भू-राजकीय तणाव या कारणांमुळे गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक वाढल्याने दरांमध्ये ही तेजी नोंदवली जात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. इंडियन बुलियन बाजाराच्या माहितीनुसार, आजच्या व्यवहारात सोन्याच्या किमतीत किरकोळ ते मध्यम स्वरूपाची वाढ झाली असून, चांदीचे दर वेगाने वाढताना दिसत आहेत.

दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम सुमारे 15,700 ते 16,000 रुपयांच्या दरम्यान आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम अंदाजे 14,400 ते 14,700 रुपये इतका आहे. स्थानिक कर, वाहतूक खर्च आणि मागणी-पुरवठ्यामुळे शहरनिहाय दरांमध्ये थोडाफार फरक दिसून येत आहे.

दरम्यान, लग्नसराई आणि सणासुदीचा हंगाम सुरू असल्यामुळे सामान्य ग्राहकांसह गुंतवणूकदारही सोने-चांदीच्या दरांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात जागतिक आर्थिक अनिश्चितता कायम राहिल्यास सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारातील ताजे दर आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा, असा सल्ला दिला जात आहे. एकंदरीत पाहता, आज सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंनी सराफा बाजारात आपली मजबुती कायम ठेवली आहे.

Exit mobile version