सोन्या-चांदीने गाठले आकाश, नवे उच्चांक प्रस्थापित

सोन्या-चांदीने गाठले आकाश, नवे उच्चांक प्रस्थापित

आठवड्यातील तिसऱ्या व्यवहार दिवशी, बुधवारी, मौल्यवान धातूंनी (सोने आणि चांदी) पुन्हा एकदा नवे विक्रम नोंदवत आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीला स्पर्श केला. अमेरिकेत महागाईचे अपेक्षेपेक्षा कमी (सौम्य) आकडे आणि जगभर वाढत असलेल्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीत मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत.

बुधवारच्या व्यवहार सत्रात एमसीएक्सवर सोन्याने प्रति १० ग्रॅम १,४३,५०० रुपयांचा उच्चांक गाठला, तर चांदीनेही प्रति किलो २,८७,९९० रुपयांचा विक्रमी स्तर गाठला. काही दिवसांपूर्वीही या मौल्यवान धातूंनी उच्चांक नोंदवले होते.

मात्र बातमी लिहिली जात असताना (दुपारी सुमारे १२.१६ वाजता) एमसीएक्सवर फेब्रुवारी डिलिव्हरीचे सोने १,०५९ रुपये किंवा ०.७४ टक्क्यांच्या वाढीसह प्रति १० ग्रॅम १,४३,३०० रुपयांवर व्यवहार करत होते. त्याचवेळी मार्च डिलिव्हरीची चांदी ९,९४२ रुपये किंवा ३.६१ टक्क्यांच्या उसळीने प्रति किलो २,८५,१२९ रुपयांवर ट्रेड होत होती.

हे ही वाचा:

थायलंडमध्ये रेल्वेवर क्रेन कोसळून झालेल्या अपघातात २२ जणांचा मृत्यू

‘तमिळ संस्कृती हा संपूर्ण भारताचा सामाईक वारसा’

दहशतवादी संबंधांच्या आरोपावरून पाच ५ सरकारी कर्मचारी निलंबित

‘केरलम’ साठी केरळात भाजपा डाव्यांच्या पाठीशी

डिसेंबरसाठी अमेरिकेच्या कोअर कंझ्युमर प्राइस इंडेक्स (सीपीआय) आकडेवारीनुसार महिन्यागणिक महागाईत ०.२ टक्के आणि वर्षागणिक २.६ टक्के वाढ नोंदली गेली, जी अपेक्षेपेक्षा कमी ठरली. त्यामुळे अमेरिकेचा केंद्रीय बँक भविष्यात व्याजदर कमी करू शकतो, असा विश्वास बाजाराला मिळाला असून यामुळे सोन्याच्या किमतींना पाठबळ मिळाले.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कमी महागाई आणि अमेरिकेतील रोजगारविषयक संमिश्र आकडे पाहता केंद्रीय बँक जानेवारीत व्याजदर स्थिर ठेवू शकते; मात्र वर्षभरात दोन ते तीन वेळा दरकपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे.

मेहता इक्विटीज लिमिटेडचे कमोडिटी तज्ज्ञ राहुल कलंत्री यांनी सांगितले की, इराणमधील अस्थिरता आणि जगाच्या विविध भागांतील वाढते तणाव यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोने आणि चांदीची खरेदी करत आहेत. महागाईचे आकडे अपेक्षेपेक्षा कमी आल्याने महागाईचा दबाव हळूहळू कमी होत असल्याचे संकेत मिळतात, असेही त्यांनी नमूद केले.

तज्ज्ञांच्या मते, सोन्यासाठी १,३९,५५० ते १,३७,३१० रुपयांच्या आसपास सपोर्ट आहे, तर वरच्या दिशेने १,४४,३५० ते १,४६,६७० रुपयांदरम्यान रेजिस्टन्स आहे. चांदीसाठी २,६९,८१० ते २,५४,१७० रुपये हा सपोर्ट स्तर असून २,७९,८१० ते २,८४,४७० रुपयांदरम्यान रेजिस्टन्स आहे.

बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे की, इराणमधील अस्थिरता, व्हेनेझुएला आणि ग्रीनलँडशी संबंधित तणाव यामुळेही सोने-चांदीच्या किमती वाढण्यास हातभार लागत आहे.

तज्ज्ञांच्या मते, डॉलरच्या किमतींतील चढ-उतार आणि अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या टॅरिफविषयक निर्णयापूर्वी या आठवड्यात सोने-चांदीच्या किमतींमध्ये अस्थिरता कायम राहू शकते.

तज्ज्ञांनी पुढे सांगितले की, जोरदार तेजी नंतर चांदीच्या किमती शॉर्ट आणि मिडियम-टर्म सरासरीपेक्षा बर्‍याच वर आहेत. सौरऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने, एआय, इलेक्ट्रॉनिक्स अशा उद्योगांमधील वाढती मागणी आणि बाजारातील मर्यादित पुरवठा यामुळे चांदीत मोठ्या प्रमाणावर खरेदी दिसून येत आहे.

Exit mobile version