“पुतिनला पाठिंबा देण्याची किंमत भारताला भोगावी लागत आहे”

अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम

“पुतिनला पाठिंबा देण्याची किंमत भारताला भोगावी लागत आहे”

अमेरिकेचे वरिष्ठ रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी भारतासह रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “पुतिनला पाठिंबा देण्याची किंमत भारताला भोगावी लागत आहे” आणि इतर देशांनाही याचे परिणाम लवकरच भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे.

ग्रॅहम यांच्या म्हणण्यानुसार, रशियाकडून तेल खरेदी करून भारत आणि इतर देश अप्रत्यक्षपणे युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी पुतिनला आर्थिक मदत करत आहेत. त्यांनी स्पष्ट केलं की, “रशियन तेल खरेदी करणं म्हणजे पुतिनच्या युद्धयंत्राला इंधन पुरवणं आहे, ज्यामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. हे पाहून तुम्हाला सध्या कसे वाटते? भारत पुतिनला पाठिंबा देण्याची किंमत भोगत आहे. बाकीच्यांसाठी, तुम्हालाही लवकरच ते भोगावे लागेल, ” असा इतर देशांना  इशारा त्यांनी दिला.

रशियाने कीववर केलेल्या हल्ल्यानंतर लिंडसे ग्रॅहम यांची ही प्रतिक्रिया आली. त्यांनी कीवमध्ये झालेल्या हल्ल्याचा व्हीडीओही पोस्ट केला आहे. या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ माजली असून, भारताकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप देण्यात आलेली नाही.

हे ही वाचा : 

“मी टोकियोची चायवाली तुम्ही भारताचे चायवाले”

ममता बॅनर्जीं भाषावाद करतायेत, मतदार यादीत रोहिंग्या, घुसखोर अन मृतांची नावे!

“पंतप्रधान, मुख्यमंत्री, न्यायाधीश यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा अधिकार नाही”

“माफी न मागितल्यास जनता काँग्रेसमुक्त भारत करेल”

दरम्यान, युक्रेनमधील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी (२८ ऑगस्ट) पहाटे राजधानीत क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या एकत्रित हल्ल्यात किमान २३ लोक ठार झाले आणि डझनभर जण जखमी झाले. मृतांमध्ये चार मुलांचा समावेश आहे. युरो न्यूजने वृत्त दिले आहे की या हल्ल्यांमुळे कीवमधील युरोपियन युनियनच्या राजनैतिक मिशनचेही नुकसान झाले आहे, ज्यामुळे युरोपियन नेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

Exit mobile version