भारतीय शेअर बाजारासाठी पुढील आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. महागाई, म्यूच्युअल फंड, एफआयआय (FII) व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक आकडेवारीनुसार बाजाराची दिशा निश्चित होईल. याशिवाय भारत-रशिया संबंध अधिक दृढ होत असताना, अमेरिका-भारत यांच्यातील संभाव्य व्यापार करारावरही पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष राहील.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये संरक्षण, व्यापार, अर्थव्यवस्था, आरोग्यसेवा, शिक्षण, संस्कृती आणि माध्यम क्षेत्रातील १६ नव्या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. पुतिन यांनी आश्वासन दिले की रशिया भारताला इंधनाचा स्थिर आणि अखंड पुरवठा करत राहील. विशेष म्हणजे ही घोषणा अशा वेळी झाली आहे जेव्हा भारत-अमेरिका व्यापार करारासाठी चर्चा सुरू आहे आणि अमेरिकेने भारताला रशियन तेलाची खरेदी कमी करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा..
‘सशस्त्र सेना ध्वज दिवस निधी’मध्ये योगदान द्या
पुतीन यांना मोदींनी गीता दिली म्हणजे हिंदू धर्मात धर्मांतरित केले नाही!
डीजीसीएचा इंडिगोला कठोर इशारा!
गोव्यात नाइटक्लबला लागलेल्या आगीत २५ दगावले
भारत सरकारकडून १२ डिसेंबर रोजी महागाईचे आकडे जाहीर केले जातील. ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाई ०.२५ टक्के होती. याच दिवशी विदेशी चलन साठा व वाढदराचे आकडेही येतील, ज्याचा शेअर बाजारावर परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे अमेरिकेची आर्थिक माहितीही जागतिक बाजारांना दिशा देईल, ज्यात अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांवरील निर्णय समाविष्ट आहे. भारतीय शेअर बाजारासाठी गेलेला आठवडा मिश्र प्रतिक्रिया घेऊन संपला. निफ्टी मध्ये १६.५० अंक ( ०.०६% ) अशी किरकोळ घसरण झाली व निर्देशांक २६,१८६.४५ वर बंद झाला. तर सेन्सेक्स ५.७० अंक ( ०.०१% ) घटून ८५,७१२.३७ वर बंद झाला.
या काळात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये घसरण दिसून आली. निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक ४४८.६५ अंक ( ०.७३% ) घसरून ६०,५९४.६० वर, तर निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांक ३२१.५० अंक ( १.८०% ) घसरून १७,५०७.७५ वर बंद झाला. गेल्या आठवड्यात निफ्टी आयटी निर्देशांकाने ३.४७% वाढ नोंदवत आघाडी घेतली. त्याचबरोबर ऑटो, मेटल, प्रायव्हेट बँक आणि सर्विसेस निर्देशांकही हिरव्या चिन्हात बंद झाले. दुसरीकडे एनर्जी, फार्मा, एफएमसीजी, रिअल्टी, इन्फ्रा, पीएसई आणि कंझ्युमर ड्युरेबल्स निर्देशांक लाल चिन्हात बंद झाले.
