मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी मुंबई येथे ‘फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड्स २०२६ ‘या कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरण केले गेले. राष्ट्रीय शेअर बाजार एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आशीषकुमार चौहान यांना फोर्ब्स इंडिया जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. इतर पुरस्कार विजेत्यांमध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी, अजित आयझॅक, सारा आयझॅक, क्रिस गोपालकृष्ण, प्रसन फिरोदिया, अभिमन्यू मुंजाल, हर्ष जैन, पियुष बन्सल आणि अनिश शहा यांंनाही गौरविण्यात आले.
आशीषकुमार चौहान यांना जो जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे, त्यामागे त्यांनी आपल्या देदिप्यमान कारकीर्दीत केलेल्या अनेक गौरवास्पद घटना आहेत.
२००० ते २००९ ते या काळामध्ये त्यांनी रिलायन्स समुहासोबत अत्यंत महत्त्वाच्या पदांवर काम केलं. आयपीएलमध्ये समावेश असलेल्या मुंबई इंडियन्सच्या जडणघडणीत त्यांची महत्वाची भूमिका होती. त्यांच्याकडे काहीही सोपवा, ते तुम्हाला यशस्वी करून देतात. हा एक असा गुण आहे ज्यामुळे कधी ते मुकेश अंबानी आणि सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा दोन अत्यंत शक्तिशाली व्यक्तिंचे ते विश्वासपात्र ठरू शकले.
२००९ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा मोर्चा वळवला ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’कडे. ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’च्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. २०१२ मध्ये मुख्य कार्यकारी पदावर त्यांना बढती मिळाली. ही जबाबदारी मिळाल्यानंतर पुढच्या काळामध्ये त्यांनी जे काही केले त्याचे वर्णन ‘कमाल’ या एकाच शब्दात होऊ शकते. ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’मध्ये यांनी डिजिटल क्रांती घडवली. बाजारातील सौदे स्क्रीनवर दिसू लागले.
२०१२ ते २०२२ या काळात त्यांनी ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’ला एका नव्या उंचीवर नेलं. याच कामगिरीमुळे त्यांना २०२२ मध्ये ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’ची सूत्र त्यांच्याकडे सोपवण्यात आली.
अन्य पुरस्कार विजेते असे –
आयकॉन ऑफ एक्स्लन्स – राणी मुखर्जी
समाजसेवा – अजित आयझॅक, सारा आयझॅक, अजित आयझॅक फाऊंडेशन.
समाजसेवा – क्रिस गोपालकृष्णन, अध्यक्ष – ऍक्सिलर व्हेन्चर्स सह-संस्थापक – इन्फोसिस
उत्थान करणारे नेतृत्व – प्रसन फिरोदिया, व्यवस्थापकीय संचालक – फोर्स मोटर्स लिमिटेड
पुढच्या पिढीतील उद्योजक –अभिमन्यू मुंजाल, व्यवस्थापकीय संचालक – हिरो फिनकॉर्प
फोर्ब्स इंडिया संपादकांचा जीवनगौरव पुरस्कार – आशीषकुमार चौहान, मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक – एनएसई राष्ट्रीय शेअर बाजार
वर्षातील स्टार्टअप – हर्ष जैन, सह-संस्थापक व सीओओ – ग्रो
वर्षातील सर्वोत्तम उद्योजक – पियुष बन्सल, सह-संस्थापक व सीईओ – लेन्सकार्ट
वर्षातील सीईओ – अनिश शहा, मुख्य कार्यकारी अधिकारी – महिंद्र अँड महिंद्र
