कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत अनेक कर्मचाऱ्यांना एकच प्रश्न पडतो—संपूर्ण पीएफ रक्कम कधी काढता येते? यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ( Employees’ Provident Fund Organisation) यांनी सोपे आणि स्पष्ट नियम ठरवले आहेत. भविष्य निर्वाह निधी म्हणजे निवृत्तीनंतर उपयोगी पडणारी बचत, पण गरज पडल्यास ती आधीही वापरता येते.
जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी सोडली आणि तो सलग दोन महिने बेरोजगार राहिला, तर तो संपूर्ण पीएफ रक्कम काढू शकतो. मात्र नोकरी बदलत असाल, तर पीएफ काढण्याऐवजी जुने खाते नवीन नोकरीत जोडणे जास्त फायद्याचे ठरते. यामुळे तुमची बचत तुटत नाही.
हे ही वाचा :
“इराणमध्ये खोमेनी शासन बदलायची गरज!”
“उत्तर भारतात महिलांना घरीच राहण्यास सांगितले जाते” द्रमुक खासदार बरळले
मुंबई महापालिका निवडणुकीत वापरली जाणारी ‘पाडू’ मशीन काय आहे?
चार वर्षांनंतर आयसीसी वनडे रँकिंगमध्ये विराट कोहली पुन्हा अव्वल
निवृत्तीच्या वेळी, म्हणजे वय अठ्ठावन्न वर्षे पूर्ण झाल्यावर, कर्मचारी कोणतीही अडचण न येता संपूर्ण पीएफ काढू शकतो. तसेच चौपन्नाव्या वर्षानंतर, निवृत्ती जवळ आली असेल आणि पैशांची गरज भासली, तर पीएफमधील थोडी रक्कम काढण्याची परवानगी दिली जाते.
कर्मचाऱ्याला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास किंवा कर्मचारीचा मृत्यू झाल्यास, संपूर्ण पीएफ रक्कम थेट कर्मचारी किंवा त्याच्या कुटुंबीयांना दिली जाते. याशिवाय गंभीर आजारावर उपचार, उच्च शिक्षण, लग्नाचा खर्च, तसेच घर खरेदी किंवा बांधकामासाठीही पीएफमधून पैसे काढता येतात. मात्र या कारणांसाठी काही अटी असतात आणि नेहमी पूर्ण रक्कम मिळेलच असे नाही.
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पाच वर्षांपूर्वी पीएफ काढल्यास कर लागू होऊ शकतो. त्यामुळे पीएफ काढण्याचा निर्णय घ्यायच्या आधी नियम नीट समजून घेणे गरजेचे आहे. एकंदरीत, खूप गरज असेल तेव्हाच पीएफ काढावा आणि शक्यतो ही रक्कम निवृत्तीसाठी साठवून ठेवणेच योग्य ठरते.
