वडाळ्यात उभारली १५ फुटी तलवार; बिलाली फाउंडेशनचा उद्योग

चौघांवर गुन्हा दाखल

वडाळ्यात उभारली १५ फुटी तलवार; बिलाली फाउंडेशनचा उद्योग

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी वडाळा परिसरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वडाळ्यातील संगम नगर येथील ‘जय भवानी मैदान’ या सार्वजनिक मैदानात कोणतीही अधिकृत परवानगी न घेता १५ फूट उंच लोखंडी तलवारीची प्रतिकृती उभारण्यात आली होती. या तलवारीवर अरबी भाषेतील धार्मिक मजकूर असल्याने प्रकरण संवेदनशील बनले असून पोलिसांनी तत्काळ कारवाई केली आहे.

वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांना नियंत्रण कक्षामार्फत सार्वजनिक मैदानावर बेकायदेशीरपणे जागा अडवून शस्त्रासारखी रचना उभारल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले असता मोठी गर्दी जमलेली होती. तपासात सुमारे ४६२ सेंटीमीटर (१५ फूट) उंच, लोखंडी पत्र्यांपासून बनवलेली तलवारीची प्रतिकृती उभारल्याचे आढळून आले.

या प्रकरणी ‘बिलाली यंग फाउंडेशन’च्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची नावे मोहम्मद शजाद, मोहम्मद अरबाज, अरबाज मुशीर खान आणि फिरोज हसन अली शेख अशी आहेत. प्राथमिक चौकशीत संबंधितांकडून कोणतीही प्रशासकीय परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा:

आधी ट्रम्पना ठोकले; त्यानंतर केले मदर ऑफ ऑल डील

पंडवानी गायिका प्रभा यादव, सुप्रसिद्ध चित्रकार चिंतामणी हसबनीस यांना भरतमुनी सन्मान

गोवा विशेष: युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षांचे गोव्याशी आहे खास नाते! जाणून घ्या नेमकं प्रकरण

भारत- युरोपियन युनियनमधील करारामुळे अमेरिकेचा होतोय तीळपापड! प्रकरण काय?

प्रजासत्ताक दिनासारख्या संवेदनशील दिवशी सार्वजनिक ठिकाणी अशा स्वरूपाची तलवार उभारल्याने सामाजिक सलोख्याला धक्का बसू शकतो आणि नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

हा प्रकार दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करून सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न असल्याचे नमूद करत पोलिसांनी तलवारीची प्रतिकृती जप्त केली असून संबंधितांवर शांतता भंग व अनधिकृत सार्वजनिक प्रदर्शनासंबंधी कलमांखाली कारवाई सुरू आहे. पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version