मुर्शिदाबादमध्ये बांगलादेशमार्गे म्यानमारला परतण्याच्या प्रयत्नात असलेले ३ रोहिंग्या ताब्यात!

१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुर्शिदाबादमध्ये बांगलादेशमार्गे म्यानमारला परतण्याच्या प्रयत्नात असलेले ३ रोहिंग्या ताब्यात!

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या लालगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत, भारत-बांगलादेश सीमेजवळील गावातून ३ रोहिंग्या नागरिकांना अटक करण्यात आली आहे. हे तिघेही बांगलादेशमार्गे म्यानमारमध्ये परतण्याच्या तयारीत होते, तत्पूर्वी कारवाई करत त्यांना अटक करण्यात आली.

पोलीस सूत्रांनुसार, अटकेत घेतलेले तिघेही म्यानमारचे मूळ रहिवासी आहेत. चौकशीत त्यांनी सांगितले की, ते काही वर्षांपूर्वी म्यानमारमधून बांगलादेशात आले होते आणि त्यानंतर बेकायदेशीर मार्गाने भारतात प्रवेश केला. भारतात आल्यावर त्यांनी कामाच्या शोधात विविध राज्यांत प्रवास केला आणि तेव्हापासून भारतामध्ये अनधिकृतपणे वास्तव्यास होते.

हे ही वाचा :

नेपाळच्या तुरुंगातून पळालेली पाकिस्तानची महिला त्रिपुरात

पंतप्रधान मोदी एनडीए कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

शार्कच्या हल्ल्यात तरुण गंभीर

९ ऑक्टोबर रोजी गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी लालगोला परिसरात छापा टाकून ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींसोबत ४ अल्पवयीन मुलां उपस्थिती होती. पोलिसांनी अल्पवयीन मुलांना सुधारगृहात पाठवले, तर तीन रोहिंग्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी स्पष्ट केले की, ही कारवाई सीमा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि अनधिकृत स्थलांतर थांबवण्यासाठी करण्यात आली आहे.

Exit mobile version