आरोपी डॉ. शाहीन, मुझम्मिल यांनी रोख रकमेतून खरेदी केली होती ब्रेझा कार आणि…

समोर आलेले फोटो तपास यंत्रणांच्या रडारवर

आरोपी डॉ. शाहीन, मुझम्मिल यांनी रोख रकमेतून खरेदी केली होती ब्रेझा कार आणि…

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास युद्ध पातळीवर सुरू असून विविध राज्यांमधून मिळालेले धागेदोरेही जोडले जात आहेत. अशातच आता या प्रकरणात असलेल्या आरोपींपैकी एक डॉ. शाहीन हिचा एक फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच तपास यंत्रणांच्या रडारवरही हा फोटो आला आहे. या फोटोमध्ये डॉ. मुझम्मिल देखील असल्याने संशयाचा ढग अधिक गडद झाला आहे.

डॉ. शाहीन हिने काही दिवसांपूर्वी ब्रेझा कार खरेदी केल्याची बाब उघड झाली आहे. ही गाडी तिने २५ सप्टेंबर रोजी खरेदी केली होती. विशेष म्हणजे या कार खरेदीचा व्यवहार करताना तिने संपूर्ण पैसे हे रोख स्वरूपात दिले होते. त्यामुळे याचा अधिकच तपास केला जात आहे. तसेच समोर आलेल्या फोटोनुसार शाहीनने कार खरेदी केली तेव्हा मुझम्मिल तिच्यासोबत उपस्थित होता हे ही स्पष्ट झाले आहे. ब्रेझासोबत असलेल्या दोघांचा फोटो आता तपासाचा महत्त्वाचा भाग झाला आहे. तसेच रोख रक्कम आणि खरेदीची वेळ यामुळे सुरक्षा यंत्रणांच्या संशयाला आणखी बळकटी मिळाली आहे.

२५ सप्टेंबर २०२५ रोजी मुझम्मिलने शाहीनच्या नावाने मारुती सुझुकीच्या शोरूममधून सिल्व्हर रंगाची ब्रेझा कार खरेदी केली. संपूर्ण व्यवहार हा रोख स्वरूपात करण्यात आला होता, जे संशयास्पद आहे. शाहीन आणि मुझम्मिल दोघेही घटनास्थळी उपस्थित होते आणि त्यांचा कारसोबत काढलेला फोटो आता तपासात महत्त्वाचा पुरावा आहे. स्फोटके वाहून नेण्यासाठी किंवा बॉम्ब पोहोचवण्यासाठी या गाडीचा वापर करण्यात आला होता का? किंवा करण्यात येणार होता का? या दृष्टीने तपास सुरू आहे.

हेही वाचा..

दिल्ली स्फोटाप्रकरणी काश्मीर खोऱ्यात छापेमारी

१ कोटींचे बक्षीस असलेला नक्षलवादी नेता माडवी हिडमाचा खात्मा

आत्मघाती बॉम्बस्फोट ही एक ‘शहीद मोहीम’ …उमर नबीचा व्हीडिओ आला समोर!

हसीना प्रकरणावरील निर्णयानंतर बांगलादेशात पुन्हा अराजकता; अश्रुधुर, साउंड ग्रेनेड, लाठीमार!

लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी कार बॉम्बस्फोट झाला होता. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यात १४ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंतच्या तपासात व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. हे मॉड्यूल जम्मू आणि काश्मीरमधून दिल्ली-एनसीआरमध्ये शस्त्रे आणि स्फोटके आणण्यात सहभागी होते. या स्फोटातील मुख्य आरोपी हे डॉक्टर आहेत.

Exit mobile version