दिल्ली स्फोटप्रकरणातील आरोपी अहमद सय्यदला साबरमती तुरुंगात धोपटून काढला!

कैद्यांशी उडाला खटका

दिल्ली स्फोटप्रकरणातील आरोपी अहमद सय्यदला साबरमती तुरुंगात धोपटून काढला!

गुजरात एंटी-टेररिस्ट स्क्वॉड (ATS) ने अलीकडेच अटक केलेला ऱायसिन विषाच्या माध्यमातून दहशतवादी कट प्रकरणातील संशयित अहमद मोहीयुद्धीन सैयद याला मंगळवारी अहमदाबादमधील उच्च-सुरक्षा असलेल्या साबरमती सेंट्रल जेलमध्ये तीन अंडरट्रायल कैद्यांसोबत झालेल्या भांडणात दुखापत झाली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

भांडणानंतर कारागृह प्रशासनाने या घटनेबाबत स्थानिक पोलिसांना एफआयआर नोंदवण्याची विनंती केली आहे, असे जेल अधीक्षक गौरव अग्रवाल यांनी सांगितले. सैयद आता धोक्याबाहेर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अग्रवाल म्हणाले, काही अज्ञात कारणांमुळे सैयद आणि इतर तीन कैद्यांमध्ये भांडण झाले. या भांडणात सैयदला दुखापत झाल्याने त्याला तातडीने जवळील रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आणि नंतर पुन्हा जेलमध्ये परत आणले. या घटनेची माहिती आम्ही स्थानिक पोलिसांना दिली आहे आणि लवकरच या प्रकरणात एफआयआर नोंदवला जाईल, असेही आयपीएस अधिकारी अग्रवाल यांनी सांगितले.

हे ही वाचा:

एसआयआर प्रक्रिया सुरू होताच प. बंगालमध्ये बेकायदेशीर बांगलादेशींची पळापळ

हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद फाशीच्या शिक्षेवर काय म्हणाले?

सरबजीतचा लाहोर पोलीस करतायेत छळ

बिहार : भाजपचे केशव प्रसाद मौर्य पर्यवेक्षकपदी निवड

हैदराबादचा रहिवासी आणि एमबीबीएस डॉक्टर असलेला सैयद हा ८ नोव्हेंबर रोजी गुजरात एटीएसने अटक केलेल्या तीन दहशतवाद संशयितांपैकी एक होता. त्यांच्यावर शस्त्रास्त्रांसह अत्यंत घातक ‘रायसिन’ विष वापरून मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.

एटीएसने सैयदच्या हैदराबादमधील घरी शोध घेऊन काही अज्ञात रसायने आणि कच्चा माल जप्त केला होता. काही दिवसांपूर्वी पोलिस कोठडी संपल्यानंतर या तिघांना स्थानिक न्यायालयाने न्यायिक कोठडीत साबरमती सेंट्रल जेलमध्ये पाठवले होते, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

Exit mobile version